आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवगन शिक्षण संस्था संचालित बीड येथील सौ. केएसके महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर रुजू झालेले बाबुराव केशवराव गालफाडे हे ३० वर्ष ८ महिने २९ दिवसाच्या प्रदीर्घ सेवेनंतर पाटोदा येथील वसंत दादा पाटील महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा सेवा गौरव सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
केज येथील बाबूराव केशवराव गालफाडे हे जून १९९० मध्ये नवगन शिक्षण संस्थेच्या सौ. के. एस. के. महाविद्यालयात कनिष्ठ पदावर रुजू झाले होते. ते पाटोदा येथील वसंत दादा पाटील महाविद्यालयातून ३० वर्ष ८ महिने २९ दिवसाची प्रदीर्घ सेवा करून ३० मे २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने बीड शहरातील नागसेन बुद्धविहार येथे त्यांच्या सेवागौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. योगेश क्षीरसागर हे होते. तर अध्यक्षस्थानी व्ही. पी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे, माजी उपप्राचार्य रमेश टाकणखार, माजी नगरसेवक गणेश वाघमारे, भय्यासाहेब मोरे, रणजित बनसोडे, नाना मस्के, कार्यालयीन अधीक्षक अशोक पवार, शिक्षक नेते उत्तमराव पवार, भगवानराव कांडेकर, प्राचार्य पांडूरंग सुतार, आरुण भोले, प्रताप मोरे, हनुमंत कांबळे, भास्कर कांबळे, प्रा. विद्यानंद गालफाडे, जितेंद्र गालफाडे, समा जाधव उपस्थित होते. या वेळी वरील मान्यवरांनी त्यांचा सपत्नीक सत्कार करीत त्यांच्या महाविद्यालयातील कार्य व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.