आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कार अपघातात पतीचा मृत्यू; पत्नी, २ मुले जखमी

पाटोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लिंबागणेश येथून आपल्या कुटुंबासह मूळ गावी बावीला (ता. आष्टी) कारमधून भरधाव वेगात निघालेल्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला असून एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी (ता. ६) दुपारी साडेचारच्या सुमारास पाटोदा-मांजरसुंबा मार्गावर मंगेवाडी फाट्यानजीक घडला.

आष्टी तालुक्यातील बावी येथील रहिवासी असलेले व पेशाने ट्रकचालक असलेले किशोर निवृत्ती सातपुते (३२) हे आपली पत्नी व दोन मुलांसह मंगळवारी दुपारी लिंबागणेश येथून कारने (एमएच १४ डीएक्स १३०४) आपल्या बावी या गावी जाण्यासाठी निघाले होते. किशोर सातपुते हे स्वतः वाहन चालवत होते. त्यांची गाडी पाटोदा नजीक असलेल्या मंगेवाडी फाट्या परिसरातील उतारावर भरधाव वेगात असताना त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठड्याला धडकून थेट रस्त्याच्या खाली कोसळली. या अपघातात गाडीच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला व किशोर सातपुते यांचा जागीच मृत्यू झाला.

मात्र सुदैवाने पत्नी व दोन मुले या अपघातातून बचावले. अपघाताची माहिती कळताच पाटोदा पोलिस ठाण्याचे एपीआय रामचंद्र पवार, पोलिस कर्मचारी मदन क्षीरसागर, गणेश भोसले हा घटनास्थळी दाखल झाले व जखमींना रुग्णालयात दाखल केले.

बातम्या आणखी आहेत...