आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक वाद:पत्नीचा खून करून पतीने घेतला गळफास, एकाच चितेवर अंत्यसंस्कार

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पती-पत्नीमधील कौटुंबिक वादातून पत्नीचा मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून करत पतीने गळफास घेतल्याची घटना बीड तालुक्यातील नाळवंडी येथे गुरुवारी सकाळी समोर. सायंकाळी दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाबासाहेब रावसाहेब म्हेत्रे (४५) व कुशावर्ता बाबासाहेब म्हेत्रे (४०) अशी दोघांची नावे आहेत. बाबासाहेब हे अल्पभूधारक असून ते व पत्नी इतरांच्या शेतात मजुरी करून उदरनिर्वाह चालवायचे. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. बाबासाहेब आणि कुशावर्ता यांच्यात सातत्याने वाद होत होते. किरकोळ कारणातून होणाऱ्या सततच्या वादाने बुधवारी रात्री उग्र स्वरूप धारण केल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सकाळी आईवडील झोपेतून उठत नसल्याचे पाहून मुलांनी त्यांच्या खोलीचे दार वाजवले. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर दार तोडण्यात आले. कुशावर्ता यांचा मृतदेह जमिनीवर तर बाबासाहेब हे गळफास घेतलेल्या अवस्थेत होते.