आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:गितेवाडीजवळ अपघातात पती ठार, पत्नी जखमी

आष्टी/कडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मृत मावसभावाच्या कुटुंबाचे सांत्वन करून परतणाऱ्या दांपत्याच्या दुचाकीला अज्ञात चारचाकीने गितेवाडी फाट्याजवळ जोराची धडक दिली. शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी आहे. महादेव पाराजी सापते (३७) असे मृताचे नाव आहे.

खाकाळवाडी (ता. आष्टी) येथील महादेव सापते हे पत्नीसह धामणगाव येथे मावसभावाच्या कुटुंबाचे सांत्वनासाठी गेले होते. नातेवाइकांसोबत जेवण करून रात्री दोघेही दुचाकीवरून गावाकडे येत होते. याचवेळी भरधाव अज्ञात चारचाकीने गितेवाडी फाट्यानजीक दुचाकीला धडक दिली. यात महादेव सापतेचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी पुष्पा महादेव सापते (३२) गंभीर जखमी झाल्या.

बातम्या आणखी आहेत...