आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुन:खुनाच्या प्रकरणात पतीच्या कोठडीत 7 जूनपर्यंत वाढ ; मृत व आरोपी यांच्यात एका रसवंतीवर भांडण झाले होते

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करणारा नराधम पती बालाजी वैजनाथ लोणीकर (२७, रा. गणेशपार, परळी, जि. बीड ह.मु. प्‍लॉट नं. डी-८ भानुदासनगर, औरंगाबाद) याच्या पोलिस कोठडीत ७ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. व्ही. सपाटे यांनी शुक्रवारी दिले. या प्रकरणात मृत मधुरा लोणीकर (२१) यांचे वडील एकनाथ नारायण गायकवाड (४५, रा. कृष्णानगर, परळी जि. बीड) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले असता, सहायक सरकारी वकील सुनील जोंधळे यांनी गुन्हा केल्यानंतर आरोपीने नियंत्रण कक्षाला फोन करून खुनाची माहिती दिली होती, त्या फोनची रेकॉर्डिंग हस्तगत करून आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. गुन्हा घडण्यापूर्वी मृत व आरोपी यांच्यात एका रसवंतीवर भांडण झाले होते, ती रसवंती कोठे आहे, तसेच मृत ही गर्भवती असल्याचे तपासात समोर आले आहे, त्या अनुषंगाने तपास करायचा असल्याने आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...