आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार संघात‎ चढाओढ:खुंटेफळ उपसा सिंचन योजना मी‎ आणली, पूर्णही मीच करणार‎; आमदार सुरेश धस‎ यांचे प्रतिपादन‎‎

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी तालुक्यातील जनतेच्या‎ जिव्हाळ्याच्या असलेल्या अनेक‎ प्रकल्पांबाबत व पाणी‎ प्रश्नासंदर्भात आपण गेल्या १८‎ वर्षांपासून आणलेली योजना‎ विरोधकांना खोटी वाटत होती. पण‎ आता ती खरी होत असून याचे श्रेय‎ घेण्यासाठी मतदार संघात‎ चढाओढ लागली आहे. पण ही‎ योजना मी आणली आणि पुर्ण‎ करणार, असे ठामपणे सांगत या‎ खुंटेफळ साठवण तलावाला‎ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांनी दिलेला शब्द‎ पाळला आहे.

खुंटेफळ साठवण‎ तलावाच्या उपसा सिंचन योजनेला‎ द्वितीय सुधारीत प्रशासकीय‎ मान्यता देऊन २ हजार ८०१ कोटी‎ रूपयांचा निधी दिला असल्याचे‎ आ.सुरेश धस यांनी सांगीतले.‎ आष्टी तालुक्याचा‎ जिव्हाळ्याचा असलेला खुंटेफळ‎ साठवण तलावाचा प्रश्न मंगळवारी‎ (ता.४)मंत्रीमंडळात निर्णय होऊन‎ मार्गी लागला. राज्याचे मुख्यमंत्री‎ एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने‎ मराठवाड्यातील अत्यंत मोठ्या‎ कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास‎ शासनाकडून ११ हजार ७२६‎ कोटींची द्वितीय सुधारीत‎ प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात‎ आली.

यामध्ये बीड जिल्ह्यातील‎ आष्टी तालुक्यातील खुंटेफळ‎ साठवण उपसा सिंचन योजनेस २‎ हजार ८०१ कोटी रूपयांना मान्यता‎ देण्यात आली. आठ दिवसापुर्वी‎ आष्टी येथे रेल्वे उद‌्घाटनासाठी‎ आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस यांनी आपण खुंटेफळ‎ उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी‎ लावू, असे जाहीर केले होते.‎ त्यानंतर झालेल्या पहिल्याच‎ कॅबीनेटमध्ये त्यांनी हा प्रश्न मार्गी‎ लावत दिलेल्या शब्द पाळला‎ आहे.

यामुळे आता लवकरात‎ लवकर आष्टी उपसा सिंचन‎ योजनेचे थेट पाईप लाईनचे व‎ खुंटेफळ साठवण तलावाचे काम‎ सुरू होणार आहे. लवकरचआष्टी‎ उपसा सिंचन योजना पूर्ण होऊन‎ हक्काचे पाणी मिळणार असून‎ आष्टी तालुक्याचा कायमस्वरूपी‎ पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. या‎ प्रकल्पामुळे ८१४७ हेक्टर क्षेत्र‎ ओलिताखाली येणार असल्याचे‎ आमदार्र धस यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...