आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यसनामुळे गेला जीव:'माझे दारूचे व्यसन सुटत नाही' असे कुटुंबीयांना व्हिडिओ कॉल करत एकाने घेतला गळफास, बीडमधील घटना

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझे दारूचे व्यसन सुटत नाही म्हणत एका ट्रकचालकाने कुटुंबीयांना व्हिडिओ कॉल करून गळफास घेतल्याची घटना मांजरसुंबा येथे शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी नेकनूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

लक्ष्मण रामचंद्र महागडे (रा. बार्शी, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. शुक्रवारी ते बार्शीहून जालन्याकडे ट्रकमध्ये (एमएच ४३ टीबी ४७५९) काही सामान घेऊन चालले होते. मांजरसुंब्याजवळ एका धाब्यावर ते थांबले होते. रात्री त्यांनी कुटुंबीयांना व्हिडिओ कॉल करून माझे दारूचे व्यसन सुटत नाही म्हणत एका झाडाला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...