आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोबळा कारभार:वाळूची गाडी पकडली अन् सोडून दिली... आष्टीत पोलिसांच्या ‘त्या’ कारवाईची चर्चा

आष्टी2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

अवैध वाळू वाहतुकीने अनेकांचे बळी घेतले असले तरी प्रशासनाला त्याचे काहीही घेणे-देणे नसल्याचे आष्टी येथे दिसून येते. १३ मार्च रोजी रात्री शहरातील आनंद ऋषीजी चौक येथे वाळूचे टिप्पर पोलिसांनी पकडले. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच हे टिप्पर सोडूनही देण्यात आले. या कारवाईचा ‘अर्थ’ काय? अशी शहरात चर्चा रंगली असून तहसील प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, १३ मार्च रोजी रात्री पाऊणेबारा वाजेच्या सुमारास आष्टी शहरातील आनंद ऋषीजी चौक येथे आष्टी पोलिसांनी वाळूचा टिप्पर पकडला. त्याची चौकशीही केली. कारवाई होईल, अशी याठिकाणी उपस्थित असलेल्यांना अपेक्षा होती. परंतु, पंधरा मिनिटात पोलिस तिथून निघून गेले. आता संबंधित वाळू वाहतूक करणारे टिप्पर हे सातत्याने नियमांचे उल्लंघन करत वाळू वाहतूक करत असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, यंत्रणेशी सूत्र न जुळल्याने टिप्पर पकडण्यात आले. लगोलग चमत्कार घडला व टिप्पर सोडूनही देण्यात आले. या लुटुपुटूच्या कारवाईची शहरात चांगलीच चर्चा रंगली. शिवाय या कारवाईची चित्रफीतही समाज माध्यमांतून फिरत आहे.

चौकशी करणार
आनंद ऋषिजी चौकात पकडलेल्या वाळू टिप्परबाबत आपल्याला काही माहिती नाही. असा काही प्रकार घडलेलाच नाही. जर यात तथ्य असेल तर चौकशी करून कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...