आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘मला शाळेत जायला आवडतं. शिकून मोठं व्हावंसं वाटतं, पण आमचे बाबा कारखान्यावर ट्रॅक्टर घेऊन जातात. त्यांच्यासंगं आई, छोटे भाऊ असे समदेच जातात. गावाकडे मला राहता येईल असं कुणी नाई. त्यामुळंच मलाबी कारखान्यावर यावं लागलं. इकडं अर्धा किलोमीटरवर शाळा हाय. पण रस्ता धोक्याचा असल्यानं आईवडील शाळेत पाठवायला घाबरतात. मी तरी काय करणार?’ असे नववीतील प्रेरणा भिवा झिटे सांगत होती.
कुर्ला (ता. बीड) येथील रहिवासी असलेले भिवा झिटे हे कोल्हापूर जिल्ह्यातील एका कारखान्यावर ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर घेऊन गेलेले आहेत. त्यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबच स्थलांतरित झाले. पालक गेल्यानंतर गावाकडे राहायची व्यवस्था नसल्याने नववीतील मुलगी प्रेरणा ही शाळाबाह्य झाली आहे. प्रेरणाप्रमाणेच शून्य ते १८ वयोगटातील १९०५ मुले एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात स्थलांतरित झाल्याची माहिती अवनी संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांवर अवनी संस्थेच्या वतीने नुकतेच सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. एकट्या बीड जिल्ह्यातून अठराशेवर मुले स्थलांतरित झाल्याचे आढळले, तर उर्वरित बालके ही जालना, अहमदनगर जिल्ह्यातील आहेत.
कोल्हापुरातील ११ कारखान्यांवर आढळली ० ते १८ वयोगटातील १९०५ मुले
स्थलांतरित बालके वयाेगट मुली मुले ०-३ १५५ १७२ ४-६ १४७ २१४ ७-१४ ३८७ ४३६ १५-१८ १२४ २७०
‘अवनी’ २९ वर्षांपासून कोल्हापूर, सांगली, सातारा भागात काम करते. स्थलांतरित मुलांच्या याद्या प्रशासनाला सुपूर्द केल्या. मुलांना शाळेत जायला मिळावे
बीडमध्ये सरकारने ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून वसतिगृह सुरू करायची घोषणा केली होती त्याचं काय झालं? स्थलांतरित मुलांना शिक्षण हमी कार्ड दिलेले नाही. - अनुराधा भोसले, अध्यक्षा, अवनी संस्था, कोल्हापूर.
असा झाला सर्व्हे
गाळप हंगाम सुरू होऊन २७ दिवस झाले. बीड जिल्ह्यातून बरेच कामगार स्थलांतरित झाले. अवनी संस्थेने गेल्या १५ दिवसांत कोल्हापूरच्या वारणा कारखाना, जवाहर कारखाना, पंचगंगा कारखाना, दालमिया कारखाना, दत्त शिरोळ कारखाना आदी २० जणांच्या टीमने सर्व्हे पूर्ण केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.