आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:आदर्श शिक्षण संस्था; विनायक विद्यालयाचा बारावीच्या परीक्षेत कला शाखेचा 93 % निकाल

बीड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आदर्श शिक्षण संस्था, बीड संचलित विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करत यश प्राप्त केले आहे. संस्थेच्या वतीने विद्यालयातील सर्व यशवंतांचा सत्कार करण्यात आला.महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा निकाला ९६.६६ टक्के असा लागला. कला शाखेचा निकाल ९४.२८ टक्के तर एचएससी व्होकेशनलचा निकाल ९६.८७ टक्के असा लागला आहे.

वाणिज्य शाखेतून सुरज अनिल गाडेकर ८७.१६ टक्के, मनीषा बाळासाहेब घेबंड ८३ टक्के तर आयेशा चुन्नू शेख ८१.१६ टक्के यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखेतून संदेश बाबासाहेब चोरमले ८६ टक्के, मोनिका भीमराव थोरात ८२.८३ टक्के, नेहा विजय सरवदे ८०.५ टक्के यांनी यश मिळवले. यासह एसएससी व्होकेशनल शाखेतून उजमा खमरपाशा मणियार, स्वेता बळीराम गायकवाड, सिमरन निकत शेख यांनीही यश प्राप्त केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव जयदत्त क्षीरसागर यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...