आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंत हैबत बाबांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला त्या वेळी त्यांच्यासोबत कासार समाजाचे संत महादेव कासार सहभागी होते. पुढे त्यांची समाधी माउली ज्ञानराजांच्या समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आहे. परंतु, भोवताली दुकानांचा वेढा असल्याने त्यांचे दर्शनसुद्धा घेता येत नव्हते. ज्यांनी पालखी सोहळा सुरू केला तेच दुर्लक्षित ही बाब खेदजनक वाटत होती. गेल्या वीस वर्षांपासून या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा ही सर्वांचीच इच्छा होती.
मात्र, अडथळे येत होते. अखेर वीस वर्षांची प्रतीक्षा संपली आणि पालखी सोहळ्याचे साक्षीदार प्रस्थानापूर्वीच अलंकापुरीत समाधिस्थानावर मूर्तिरूपाने विराजमान झाले. यासाठी भागवताचार्य साध्वींसह अध्यक्ष शरद भांडेकर, पारायण फंडाचे अध्यक्ष श्रीकांत इटकर, सचिव अरुण वेळापुरे, गोविंद अंधारे, चंद्रकांत शेटे, चंद्रकांत सरोदे, आनंद डांगरे, मंडलेश्वर काळे, प्रा. सुभाष दगडे, योगेश रासणे, अशोक सातपुते, रमाकांत कानडे, राजेश दोडे, अक्षय रासणे, दिनेश जुन्नरकर, विनायक महिंद्रे, लक्ष्मीकांत सासवडे, अजय कुंभकर्ण, सतीश रासणे यांच्या प्रयत्नाला यश आले आणि संत महादेव कासार समाधिस्थळी प्रस्थान सोहळ्याला मूर्तिरूपाने हजर झाले.
जयपूरहून आणण्यात आली मूर्ती मूर्तीचा प्रस्ताव स्वीकारत औरंगाबाद येथील कृष्णाप्पा सरोदे यांनी व त्यांचे सहकारी ग. मा. कासार यांनी ५० हजार रुपयांची मूर्ती जयपूरहून आळंदीला आणली. संत महादेव कासार मूर्ती स्थापन झाल्याने ज्ञानेश्वरी पारायण फड, संत महादेव कासार दिंडी सोहळा व सकल कासार समाजात आनंद व्यक्त केला जात आहे. लवकरच समाधिस्थळ सुशोभीकरणाचे काम केले जाईल, असा विश्वास शिरूरचे भूमिपुत्र तथा अखिल भारतीय कासार समाजाचे अध्यक्ष शरद भांडेकर व पुणे विकास समितीचे रमाकांत कानडे यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.