आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन‎:मुलांकडून खेळणी तुटली तर‎ रागावण्याऐवजी शिकण्याची संधी‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या लहान मुलाकडून खेळता खेळता‎ एखादे खेळणे किंवा वस्तू तुटली तर मोठी‎ माणस त्या मुलावर रागावतात, चिडतात.‎ असे न करता, आपल्या मुलासाठी ती एक‎ विज्ञान समजून घेण्याची, विज्ञान‎ शिकण्याची, तंत्रज्ञान अवगत करण्याची‎ सुसंधी असते. या संधीचे सोने करा, असे‎ प्रतिपादन राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त‎ विज्ञान शिक्षक भाऊसाहेब राणे यांनीकेले.‎ बीड शहरातील संस्कार विद्यालयाच्या‎ वतीने विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे‎ आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते‎ बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक‎ सतीश गंधे, पर्यवेक्षक राजेश राजहंस‎ विज्ञान विभागातील सर्व शिक्षक यांची‎ विशेष उपस्थिती लाभली होती.

या वेळी‎ बोलताना राणे म्हणाले, विद्यार्थ्यांना विज्ञान‎ प्रदर्शनामध्ये कोणत्या प्रयोगांना प्राधान्य दिले‎ जाते याचे मार्गदर्शन केले व नुकत्याच‎ ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने केलेल्या‎ वैज्ञानिक चाकू विषयी मुलांना प्रयोगाच्या‎ माध्यमातून विज्ञान तंत्रज्ञानाची ओळख‎ करून दिली. प्रास्ताविक राज्य शिक्षक‎ पुरस्कार प्राप्त शामसुंदर घाडगे यांनी केले‎ या कार्यक्रमात चंपावती महोत्सवात संस्कार‎ विद्यालयाच्या इयत्ता नववी क मधील‎ विद्यार्थ्यांनी आदिवासी समूह नृत्यात‎ प्रशंसनीय यश प्राप्त केल्याबद्दल नृत्य‎ मार्गदर्शक व वर्गशिक्षक प्रेरक वैद्य व‎ सहभागी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात‎ आले. सूत्रसंचालन दीपक सरदे यांनी केले,‎ तर रघुनाथ तावरे आभार मानले. या वेळी‎ विद्यार्थी, शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...