आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:लोडशेडिंग बंद न केल्यास तीव्र आंदोलन करणार, गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसकडून इशारा

गेवराई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई शहरासह ग्रामीण भागामध्ये महावितरण कडून मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग सुरु असून लोडशेडिंग बंद न केल्यास गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा महावितरण अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

गेवराई शहरासह ग्रामीण भागामध्ये महावितरणकडून मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग सुरू आहे. सध्या कडक उन्हाळा सुरु असून विद्यार्थ्यांच्या परिक्षाही सुरू आहेत तसेच मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये महावितरण कडून नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरु आहे. गेवराई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गेवराई महावितरणचे उप अभियंता विजय कपुरे यांना लोडशेडिंग बंद करण्या बाबतचे निवेदन देऊन लोडशेडिंग बंद न केल्यास राष्ट्रवादीकडून तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दत्ता दाभाडे, वसीम फारोकी, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, शहराध्यक्ष मोहसिन शेख, नविद मशायक आदी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...