आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:सोशल मीडियातून जातीय तेढ‎ निर्माण केल्यास, कारवाई करू‎

केज‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडे सोशल मीडियाचा वापर‎ वाढला असून काही विकृत बुद्धीचे‎ समाज कंटक सोशल मीडियाचा‎ गैरवापर करून दोन समाजात जातीय‎ तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे‎ स्टेटस, व्हिडीओ, फोटो अपलोड‎ करीत द्वेष भावना निर्माण करतात.‎ अशा व्यक्तींवर पोलीस प्रशासनाकडून‎ कायदेशीर कारवाई केली जाईल असा‎ इशारा केज ठाण्याचे प्रमुख सपोनि‎ शंकर वाघमोडे यांनी केले आहे.‎ समाजातील बहुतांशी नागरिक‎ गुण्यागोविंदाने नांदत असतात. मात्र,‎ काही विकृत बुद्धीचे समाज कंटक‎ सोशल मीडियाचा गैरवापर करून दोन‎ समाजात तेढ निर्माण होईल अशा‎ प्रकारे वागतात.

यात शिकाऊ विद्यार्थी‎ यांचाच बळी जाण्याची ९९ टक्के‎ शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी अशा‎ लोकांपासून मुलांना दूर ठेवावे. समाज‎ माध्यमांचा चुकीचा वापर केल्यास दोन‎ समाजात भांडण - तंटे होऊन जातीय‎ तेढ निर्माण होऊन गुन्हे दाखल होऊ‎ शकतात. त्यामुळे तुमच्या मुलाचे‎ भविष्य खराब होऊ शकते याची‎ काळजी मुलांनी घ्यावी, असे आवाहन‎ ही सपोनि शंकर वाघमोडे यांनी केले‎ आहे. पोलीस प्रशासन व सायबर‎ क्राईम विभाग व्हाट्सएप, फेसबुक,‎ इन्स्टाग्राम, ट्विटर या गोष्टीकडे‎ बारकाईने लक्ष ठेवून दररोज चेक करत‎ आहोत. केज तालुक्यात व शहरात‎ शांततामय वातावरण आहे.

मात्र कोणी‎ समाजकंटक शांततामय वातावरण‎ खराब करून दोन समाजात जातीय‎ तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे‎ निदर्शनास आल्यास त्यांचेविरुद्ध योग्य‎ ती कायदेशीर कार्यवाही करण्यात‎ येईल, असा इशारा सहायक पोलीस‎ निरीक्षक// वाघमोडे यांनी दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...