आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चातुर्मासकालीन प्रवचन:घराला मंदिराप्रमाणे पवित्र निर्मळ रूप दिले तर हेच घर ; किरणसुधाजी महाराजांचे प्रतिपादन

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंब हेच मानवाचे प्रथम देवालय. जिथे घालवलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक घटिका ही आल्हाददायी ठरवून सुखाची अनुभूती देते. जन्मापासून ते जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत मानवाला प्रेम, स्नेह, सहानभूतीने आपलेपणाची आपुलकी मिळते. त्याला कौटुंबिक प्रेमाची ‘परिवार’ अशी संज्ञा मिळते. निवाऱ्याचा आधार असतो ते घर, मंदिरात काय माणूस अर्धा तास थांबू शकेल. मात्र घरात तो २४ तास वावरतो. जर या घराला मंदिराप्रमाणे निर्मळ रूप प्रदान केले तर हेच घर स्वर्ग ठरते. त्यामुळे निर्मळता जपा, असे प्रतिपादन साध्वी किरणसुधाजी महाराज यांनी केले.

बीड येथील अमृत मंगल कार्यालयात चातुर्मासकालीन प्रवचनादरम्यान त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, जिथे निवारा मिळतो. त्यालाच घर समजावे लागते. गावकुसाला एक डेरेदार वृक्ष असतो. फळे पानाफुलाने तो लगडलेला असतो. असंख्य पक्षाचे आधाराला निवासस्थान तर प्राणीमात्राला सावलीसाठी छायाचे ठिकाण असल्याने तो वृक्ष गजबजलेला असतो.

मात्र अचानक त्या वृक्षाची पानगळ होऊन ते झाड वाळून जायला सुरुवात होते. परिसरातील शेजारी अचानक उद्भवलेल्या संकटाने अचंबित होतात व त्याला खतपाणी पुरवून हिरवेगार करण्याचा प्रयत्न करतात, मात्र ते परत पूर्वपदावर येत नाही. म्हणून तज्ज्ञाकडून त्याची चिकित्सा करतात तर त्याच्या मुळावर कीड आढळते. ही किड त्या वृक्षाचे वैभव नष्ट करते. असेच मानवी जीवनात परिवार ही वृक्षाप्रमाणेच असतो, आई-वडील प्रमुखाच्या मुळावर वृक्षाप्रमाणे परिवाराचा डोलारा उभा राहतो. त्या परिवारालाही आंतरबाह्य किडीने पोखरले जाते. परिवाराची निर्मिती ही प्रेम, त्याग, सहनशीलतेच्या मजबूत पायावर उभारली जाते.

व्यक्ती ही भावनाप्रधान असते, भावनेच्या जीवावरती एकरूपतेला जोडली जाते. त्यामुळे समर्थपणे येणाऱ्या आपत्तीला तोंड देऊ शकते संपूर्ण ही परिवारात महत्त्वाची असते. चांगला परिवार म्हणजे सर्वातील आदर्श महाविद्यालय होय. त्यामुळे परिवार टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने समंजसपणा, परस्परांचे दु:ख जाणून घेणे, आनंदात सहभागी होणे गरजेचे ठरते, असेही किरणसुधाजी महाराजांनी सांगितले.

स्वार्थ दूर ठेवून प्रत्येकाने एकत्र येणे आवश्यक
आजकाल परिस्थिती परिवारात विपरीत बनत आहे. स्वार्थापोटी भाऊ भावाला ओळखत नाही. त्यात सुशिक्षित भाऊ, अडाणी भावाची भावना जाणत नाही. स्वार्थापोटी बहीण - भावाच्या प्रेमालाही विसर पडतो. माणूस स्वार्थाने नाती तोडतो पण परस्पराची भावना तुटली जात नाही. लहान सहान गोष्टीवर घटस्फोट होत आहे. संयुक्त परिवार हा मोठा परिवार असतो त्या परिवारात भावना व कर्तव्याला ध्यान द्यावे. मात्र घराला तीर्थ बनव, असे आवाहन त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...