आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान सोहळा:गुणवत्ता असेल तर कुठल्याही क्षेत्रात पुढे जाणे अवघड नाही : माजी मंत्री क्षीरसागरमान

बीड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन्मान आणि संस्कारीत पिढी निर्माण करण्यासाठी आयुष्याचा संघर्ष नवीन पिढी समोर ठेवून दुसऱ्याच्या सुखात दुःख करण्यापेक्षा इतरांच्या सुखात सहभागी होणे महत्वाचे असते. गुणवत्ता असेल तर कुठलेही क्षेत्र अवघड वाटत नाही असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले तर बुध्दीमत्ता, गुणपत्ता कितीही असली तरी मानवता हीच महत्वाची आहे. पदापेक्षा नम्रता ही मोठी आहे असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी यांनी केले.

शहरातील माँ वैष्णो पॅलेस येथे सी.ए.कल्याणचंद कोटेचा यांनी सनदी लेखापाल म्हणून ५० वर्ष उत्कृष्ट काम करून वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा विविध प्रतिष्ठानच्या वतीने माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, विधानसभचे माजी अध्यक्ष अरूण गुजराती यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळीधुंडीराज शास्त्री महाराज पाटांगणकर, माजी आ.उषाताई दराडे, विलास बडगे, सुभाष सारडा, डॉ.योगेश क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, नितीन कोटेचा, सत्यनारायण लाहोटी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, सी.ए.कल्याणचंद कोटेचा यांनी अविरत ५० वर्षे सेवा करून वयाची ७५ वर्षे पूर्ण करणे भाग्याची गोष्ट आहे. खडतर तपश्‍चर्येतूनच जे साध्य करता आले त्याचे उत्तम संस्कारीत कुटूंबात सर्वांना एकत्रित ठेवून एकत्र कुटूंब पध्दत ठेवली. त्यांनी तीन मुलांना उत्तम शिक्षण देऊन आपला प्रवास यशस्वी करणारे कोटेचा यांनी सामाजिक कार्यात देखील मोठा सहभाग नोंदवला. सनदी अधिकारी म्हणून काम करताना योग्य आकडेमोड करत आपल्या कमाईचा हिशोब जुळवावा लागतो. शेवटी आपण काय कमावलं हे महत्वाचं आहे. शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे कोटेचा यांनी आपल्या मुलावर योग्य संस्कार करत त्यांनाही आयुष्यात स्वावलंबी जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. मान-सन्मान आणि संस्कारीत पिढी निर्माण करण्यारसाठी आयुष्याचा संघर्ष नवीन पिढी समोर ठेवणे महत्वाचे असते असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना अरूण गुजराथी म्हणाले की, बुध्दीमत्ता, गुणवत्ता कितीही असली तरी मानवता हीच महत्वाची आहे. पदापेक्षा नम्रता ही मोठी आहे. जीवनातील माणूसकी जपत जर सेवा भाव जपला तर आपल्या आयुष्याला नवीन चकाकी निर्माण होते. इतरांच्या आनंदात आनंद मानायला हवा. बीड शहरात संस्कृती जपणारे अनेक व्यक्तीमत्व आहेत. येथील नागरीक धार्मिक, मानवता वृत्तीचे आहेत. विवेक, विनय, सहनशिलता, आत्मविश्‍वास जपणारे कल्याणचंद कोटेचा यांचे संघर्षमाय जीवन आणि यशस्वी वाटचाल वाखाणन्याजोगी आहे. याप्रसंगी बबन अब्बड, संतोष सोहनी, डॉ.संजीव उपाध्ये, सी.ए.गोपाल कासट, डॉ.अरूण भस्मे, अ‍ॅड.कालिदास थिगळे, डॉ.अनुराग पांगरीकर, अजय जाहेर पाटील, बाळासाहेब माणूसमारे, आदेश नहार, विनोद पिंगळे यांच्यासह सनदी अधिकारी, व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, विविध संघटनेचे पदाधिकारी, नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...