आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुरुंदकर व्याख्यानमाला:निरनिराळ्या शक्यतांचा शोध घेतला तर भारत विकसित राष्ट्र ; कवी नारायण सुमंत यांचे प्रतिपादन

माजलगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन आहे. पालकांनी स्वतःच्या इच्छा मुलामुलींच्या माथी मारून शिक्षणातील कैक पिढ्यांची रुची कमी केली आहे. शासन, शिक्षण संस्था, शिक्षक, पालक यांनी वर्गातील प्रत्येकात असणाऱ्या निरनिराळ्या शक्यतांचा शोध घेतला तरच आपला भारत विकसित राष्ट्र होईल, असे मत प्रसिद्ध कवी नारायण सुमंत यांनी व्यक्त केेले. माजलगावातील महात्मा जाेतिबा फुले विद्यालयाच्या अनंत भालेराव सभागृहात झालेल्या नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत ‘मी का शिकतो’ या विषयावर ते बोलत होते.

या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी नवविकास मंडळाचे कार्यवाह माजी शिक्षक आमदार डी. के. देशमुख होते, तर नवविकास मंडळाचे अध्यक्ष अॅड. एस. आर. शर्मा, माजी आमदार मोहनराव साेळंके, व्याख्यानमालेचे सचिव प्रभाकर साळेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सद्भावना दिनानिमित्त संपूर्ण सभागृहास शपथ देण्यात आली. शपथेचे वाचन मुख्याध्यापक अभिमन्यू इबिते यांनी केले. धनंजय जाडे यांनी साळेगावकरांची रचना असलेले मराठवाडा गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुमंतांचा परिचय प्रभाकर साळेगावकर यांनी करून दिला.

आपल्या सव्वा तासाच्या व्याख्यानात सुमंत यांनी उपरोधिकता, वास्तवता, आदर्शवाद, संस्कार यांना केंद्रस्थानी ठेवून शिक्षण प्रणालीचा चौफेर समाचार घेतला. ‘वाच वाचुनी अति मी दमले थकले रे शिकण्याला’ या त्यांनी सादर केलेल्या विडंबनाला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास संचालक शिरीष देशमुख, डाॅ. सचिन देशमुख, मेघाली सुमंत, अॅड. सुलभा देशमुख, शंकरराव शिंदे, मुख्याध्यापक किशोर मोताळे, मुख्याध्यापिका सुनीता धसकटे, जी. एल. गंडगे, सुमंत गायकवाड, कवयित्री गौरी देशमुख, रमेश गिरी, सुधीर देशमुख, अरुण सोळंके, गणेश मुळाटै, सुरेखा कोकड, प्रेमा कुलकर्णी, रेश्मा पठाण, हिमांशू देशमुख, संतोष जोशी, राजाभाऊ शिवणकर यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, नागरिक उपस्थित होते.

शिक्षणात व्यवहारीपणा वाढीस लागल्यामुळे मूल्यांपासून फारकत होण्याची भीती सतावते अध्यक्षीय समारोप करताना डी. के. देशमुख म्हणाले, शिक्षणात व्यवहारीपणा वाढीस लागल्यामुळे मूल्यांपासून फारकत होण्याची भीती मला सतावते. राष्ट्र विकासास प्राधान्य यासाठी मी शिकतो हे महत्त्वाचे आहे. मोरेश्वर मसलेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर मुख्याध्यापक अभिमन्यू इबिते यांनी आभार मानले. धनंजय जाडे यांनी सादर केलेल्या वंदे मातरमने व्याख्यान कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...