आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंअध्ययन‎ महत्व:आवडत्या क्षेत्रात मन लावून‎ काम केल्यास यश : मुळे‎

बीड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक आणि पालकांचा विश्वास‎ जपून जीवनात यश मिळवा. उच्च‎ शिक्षण घेताना स्वयंअध्ययन‎ महत्वाचे आहे. आवडत्या क्षेत्रात‎ मन लावून काम केल्यास यश‎ मिळते असे प्रतिपादन भारतिय‎ शिक्षण प्रसारक मंडळाचे‎ प्रशासकीय अधिकारी प्रा. चंद्रकांत‎ मुळे यांनी केले.‎ बीड येथील स्वा. वि. दा.‎ सावरकर माध्यमिक व उच्च‎ माध्यमिक विद्यालयात इयत्ता १२‎ वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात‎ आला यावेळी ते बोलत होते.‎ व्यासपीठावर विद्या सभा उपाध्यक्ष‎ उमेश जगताप, शालेय समितीचे‎ अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, प्राचार्य‎ विजेंद्र चौधरी , दत्तात्रय तांबारे, प्रा‎ बाळासाहेब साळवे, प्रा विठ्ठल‎ वाघिरकर यांची उपस्थिती होती. प्रा.‎ मुळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी‎ आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे‎ जावे.

जीवनात संधी येत असतात‎ या संधीचे सोने करावे, यश प्राप्ती‎ करण्यासाठी ध्येयवेडे होऊन मेहनत‎ घ्यावी. विद्यालयाने दिलेले संस्कार,‎ गुण यांचा विकास करुन भावी‎ जीवनात यश मिळवावे असे मत‎ त्यांनी यावेळी व्यक्त केले.‎ अध्यक्षीय समारोपात प्रमोद‎ कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांनी यश‎ मिळवून आई, वडिल आणि‎ विद्यालयाचे नाव रोषण करावे.‎ प्राचार्य विजेंद्र चौधरी यांनी परिक्षेला‎ जाताना आवश्यक असलेल्या‎ सूचना दिल्या.

विद्यालयातून झालेले‎ संस्कार व ज्ञानाची शिदोरी भविष्यात‎ उपयोगी पडेल असे सांगितले.‎ यावेळी प्रतीक्षा भोसले, साक्षी‎ राऊत, संस्कृती संघई या‎ विद्यार्थिनींनी ही मनोगत व्यक्त केले.‎ सुत्र संचलन प्रा रत्नमाला सोनवणे‎ यांनी केले तर, आभार प्रा. संतोष‎ जोशी यांनी मानले. यावेळी सर्व‎ विद्यार्थी पालक व प्राध्यापकवृंद‎ यांची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...