आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीडपासून काही अंतरावर असलेल्या चऱ्हाटा फाटा परिसरात दीडशे एकरच्या आवारात मुस्लिम धर्मीयांच्या दोनदिवसीय इज्तेमास प्रारंभ झाला. गुरुवारी (दि.७) पहाटे ६ वा फजरच्या नमाजनंतर इज्तेमाला सुरुवात झाली. दुपारी १.४५ वा जोहरची नमाज झाली. सायंकाळी ४.४५ वा. असरची नमाज, सायंकाळी ६ वाजता मगरीबची नमाज, तर रात्री ८.४५ ईशाची नमाज अदा करण्यात आली. प्रत्येक नमाजनंतर उलेमा एकराम (धर्मगुरू) यांचे बयान (मार्गदर्शन) केले. दरम्यान, सायंकाळी सामुदायिक विवाह झाले.
शहराकडे येणाऱ्या दोन्ही बायपास चौकापासून प्रत्येक पाच ते १० फुटावर ट्राफिक कंट्रोल करण्यासाठी आणि इज्तेमा स्थळाकडे जाण्याची दिशा दाखवण्यासाठी स्वयंसेवक हातात काठी आणि शिट्या घेऊन उभे दिसून आले. शहरातून इज्तेमाकडे येत असताना ठिकठिकाणी स्वयंसेवक उपस्थित राहिल्याने इज्तेमास जाणाऱ्यांची चांगली सोय झाली. इज्तेमाच्या ठिकाणी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था प्रत्येक तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी वेगवेगळ्या बाजूने पार्किंगचे नियोजन केले. दीडशे एकर क्षेत्रावर हा इज्तेमा होत असल्याने या ठिकाणी हाय क्वालिटीची साउंड सिस्टिम, प्रत्येक बाजूला मोठे लाऊडस्पीकर, दहा एकरवर मंडप, हाय होल्टेज लाइट्स, रुग्णवाहिका, अग्निशामन दल वाहन, तर ५१ ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक तालुक्यातील लोकांसाठी मंडपमध्ये झोननिहाय व्यवस्था. प्रत्येक ठिकाणी गावाच्या नावाचे, तालुक्याचे फलक लावण्यात आले होते तसेच चारही बाजूने a b c d असे झोन केले आहेत.
आज शुक्रवार, ९ तारखेचे नियोजन
सकाळी १० वा. जमातसाठी जाणाऱ्यांची भेटी आणि त्याचा आढावा घेतला जाईल. दुपारी जुम्मा (शुक्रवार) ची नमाज मुख्य पेंडॉलमध्ये नमाजनंतर बयान (मार्गदर्शन) होईल. असर (सायंकाळी ५ ची नमाज) नमाज ईज्तेमाइ शादिया (सामूहिक विवाह) मगरीब नमाज सायंकाळी ६ वाजता. नंतर सामूहिक दुवा होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.