आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू माफियांचा हैदोस:माजलगावात अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर अंबाजोगाई SDO ची मध्यरात्री मोठी कार्यवाही; 2 पोकलेनसह 40 ब्रास वाळू जप्त

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद आहे. पण वाळू माफियांचा धंदा मात्र जोरात चालू आहे

एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावला आहे. तर दुसरीकडे गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधपणे वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी हैदोस घातला आहे. ही माहिती महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाताच अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शरद झाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीसा ताफा घेवून दि. 12 मे च्या मध्यरात्री छापा टाकला. ही घटना माजलगाव तालुक्यातील कौडगांव थंडी येथे घडली आहे. दरम्यान, एसडीओ झाडगे यांनी कारवाई करत गोदावरी नदीपात्रातून 2 पोकलेनसह 40 ब्रास वाळू जप्त केली आहे. यामुळे आजुबाजूच्या परिसरातील वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद आहे. पण वाळू माफियांचा धंदा मात्र जोरात चालू आहे. कोणतीही परवानगी नसताना हे रात्रभर नदी पात्रातून अवैद्यपणे वाळूचा उपसा सुरु आहे. दरम्यान, नदी काठावरील शेतकऱ्यांच्या शेतातून जेसीबी, पोकलेन घालून पात्रातून अवैध वाळु उपसा केला जात आहे. शासनाने गव्हाणथंडी आणि आडोळा या दोन ठिकाणी वाळूचे टेंडर काढले होते. मात्र या ठिकाण्यावरुन वाळू न आणता कौडगांव थंडी, मोगरा, सांडसचिंचोली येथून आणि आणत आहे. यामुळे टेंडर घेणारे व्यापारी अडचणीत आले आहेत.

कौडगांव थंडी येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली होती. यावेळी एसडीओ शरद झाडगे, केजचे तहस‍िलदार, माजलगावच्या तहस‍िलदार वैशाली पाटील, केज आणि अंबाजोगाईचा पोलीस ताफा आणि माजलगावचे मंडळ अधिकारी विकास टाकणखार, मुळाटे, तलाठी वाघमारे, आडगे, भदे, वाघचौरे, शिलवंत, इंगळे, वोवे, ईरमिले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...