आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाळू उपसा:परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिग्रस येथे अवैध वाळू उपसा; ट्रॅक्टर ट्रॉलीसह केनी जप्त

सिरसाळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिग्रस येथे सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गोदावरी पात्रात छापा मारून वाळूने भरलेली ट्रॅक्टर ट्राॅली, वाळू उपसा करणारी केनी,एक दुचाकी जप्त केली.

सहाय्यक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने मंगळवार ४ रोजी पहाटे तालुक्यातील दिग्रज येथील गोदावरी नदीच्या पात्रात पहाटे दीड वाजता छापा मारून कारवाई केली. दिग्रस येथे गोदावरी नदीपात्रात एका ट्रॅक्टरमध्ये केनीने वाळू उपसा करून वाळूची चोरटी वाहतूक केली जात होती. या छाप्यात गोदावरी पात्रातून ट्रॅक्टर केनी व लोकेशन साठी वापरली जाणारी एक दुचाकी जप्त केली. या कारवाईत ट्रॅक्टर चालकासह इतरांना ताब्यात घेतले.