आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध वाळू:बायपासवर अवैध वाळू वाहतूक; हायवा पकडला

गेवराई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतीचा मान्सून संपताच तालुक्यातील गोदावरी पत्रातून अवैध वाळू उपसा सुरू झाला असून बुधवारी रात्री तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ताब्यात तहसिल कार्यालयात आणुन लावला आहे.

गेवराई तालुक्यातील गोदावरीच्या पात्रातुन होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसुल गस्ती पथकाची नेमणूक केली आहे. दरम्यान याच पथकाच्या माध्यमातूनतहसीलदार खाडे यांनी रात्री गेवराई बायपास वरून बीडकडे जाणाऱ्या अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा ताब्यात घेत येथील तहसिल कार्यालयात आणून लावला आहे.ही कारवाई तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह तलाठी देशमुख, नेवडे, डोपे, पंकज सिरस्कर, अमोल औटी, विठ्ठल सुतार, पोलीस कॉ. काळे यांनी केली. मागीलगेल्या तीन दिवसात सलग तीन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवावर कारवाई करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...