आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:अवैध वाळू वाहतूक; दोन ट्रॅक्टर पकडले

बीड7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले. यावेळी दोघांना ताब्यात घेऊन मुद्देमालासह बीड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ८ मार्च रोजी रात्री केली. साक्षाळपिंप्री येथे अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याच्या माहितीवरून पो.नि. सतीश वाघ यांनी सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांचे पथक रवाना केले. या पथकाने ८ रोजी रात्री छापा टाकला. यावेळी अवैध वाळू वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर पकडले. उमेश जनार्दन काशीद व शहादेव महादेव क्षीरसागर (दोघे रा. साक्षाळपिंप्री) यांना ताब्यात घेतले. ते दोघेही ट्रॅक्टर मालक असून स्वत:च अवैध वाळू वाहतूक करत होते.

त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ९ लाख रुपयांच्या ट्रॅक्टरसह त्या दोघांना बीड ग्रामीण ठाण्याच्या ताब्यात दिले. सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पो. ना. जयसिंग वाघ, सोमनाथ गायकवाड, युनूस बागवान, नसीर शेख, अतुल हराळे यांनी ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...