आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक‎:माजलगाव येथे श्री विश्वकर्मा‎ जयंतीनिमित्त प्रतिमेची मिरवणूक‎

माजलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री विश्वकर्मा विठ्ठल रुक्मिणी‎ मंदिर प्रतिष्ठानच्या वतीने माजलगाव शहरात श्री‎ विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा मिरवणूक‎ मोठ्या उत्साहात पार पडली. यानिमित्त महाप्रसादाचे‎ आयोजन करण्यात आले होते.

२ फेब्रुवारी रोजी‎ सकाळी ९ वाजता धनाडे महाराज यांच्या किर्तनाचा‎ कार्यक्रम पार पडला. माजलगावच्या तालूका‎ दंडाधिकारी वर्षा मनाळे यांच्यासह तलाठी संघटनेचे‎ अध्यक्ष रूपचंद आभारे, पेशकार साबणे यांची‎ उपस्थिती लाभली होती. श्री विश्वकर्मा यांच्या‎ प्रतिमेची मिरवणूक ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९‎ वाजता पार पडली. त्यानंतर भगवान बाबा पात्रुडकर‎ यांचे किर्तन झाले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने‎ उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...