आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:पैठणच्या उजव्या कालव्यात तत्काळ पाणी सोडावे; भारतीय किसान संघाच्या वतीने केली मागणी

गेवराईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पैठणच्या उजव्या कॅनॉलखाली मोठ्या प्रमाणावर पिके आहेत. उन्हाळी हंगामातील या कालव्याच्या पाणी पाळ्या संपल्या आहेत परंतू पाउस लांबल्याने उभी पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. त्यामुळे पैठणच्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी तात्काळ पाणी सोडण्याची मागणी भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष बळीराम सोळंके यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादच्या कार्यकारी संचालकांकडे केली आहे.

पावसाळा सुरू होउन पंधरा दिवस झाले तरी या क्षेत्रात अद्यापही पाउस झाला नाही. परिणामी शेतातील उभी पिके सुकू लागली आहेत. तरी संरक्षित पाणी पाळी म्हणून एका पाणी पाळीसाठी पाणी सोडून शेतक-यांना दिलासा द्यावा. पाणी तात्काळ सोडले तरी टेल पर्यंत पाणी येण्यास बरेच दिवस लागतात. याचा विचार करून तात्काळ पाणी सोडावे अशी मागणी भारतीय किसान संघ महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष बळीराम सोळंके यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादच्या कार्यकारी संचालकांकडे केली आहे.