आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्वरित रोखा:धारूरच्या देवस्थानाच्या इनामी जमिनीचा फेरफार त्वरित रोखा

माजलगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारुर तालुक्यातील देवस्थानाच्या इनामी जमीनी संबंधी चौकशी समितीची नेमणूक केली असतांना सबंधीत समिती मार्फत कुठलीच कार्यवाही झालेली नाही. धारूर येथील तलाठी व मंडळ अधिकारी धारुर यांच्याकडून बेकायदेशीर फेरफार घेण्यात येत असुन याची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी या मागणीसाठी मंगळवार २२ नोव्हेंबर पासुन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांनी उपोषण सुरू आहे

धारूर येथील तहसिलदारांसह तलाठी, मंडळ अधिकारी हे भूखंड माफियांची पाठराखण करीत असुन धारुर तालुक्यातील गायरान जमीनीची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. शासकीय अधिकारी चुकीची व खोटी माहिती देवून वरिष्ठांची दिशाभूल करीत आहेत.काजी मशिदीच्या सर्व्हे नंबर मधील एकूण ५१५ एकर जमीन देवस्थानाची असून, या जमीनीची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे.

जी.आर. प्रमाणे जमीनीची सातबारा कोरा करून मालकी रकान्यामध्ये देवस्थानचे नाव देण्यात यावे. व झालेले फेरफार तात्काळ रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी २२ नोव्हेंबरपासून उपविभागीय कार्यालयासमोर निसार इनामदार, अनिस काजी व हफिजोद्दीन काजी यांनी उपोषण सुरू केले आहे.

बातम्या आणखी आहेत...