आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारळाचे तोरण:केजमध्ये मानाच्या पाचसह 19 गणपतींचे विसर्जन; परळीत रात्री 12 पर्यंत मिरवणूक

गणेशभक्तांचा उत्साह19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराईमध्ये २०७ ठिकाणी निघाल्या मिरवणुका गेवराई, चकलांबा व तलवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २०७ ठिकाणच्या गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक ढोल-ताशे आणि टाळ-मृदंगांच्या गजरात निघाली.

गेवराई ठाण्याच्या हद्दीत ८२, तलवाडा ठाण्याच्या हद्दीत ५४, तर चकलांबा ठाण्याच्या हद्दीत ७१ गणेश मंडळे होती. ग्रामीण भागातील गणेश मंडळाचे विसर्जन विहिरी, बारव, तलाव तर गेवराई शहरातील गणपतींचे विसर्जन चिंतेश्वर मंदिराच्या विहिरीच्या ठिकाणी व उजव्या कालव्यात करण्यात आले. राम मंदिर, केशवराव, जगदंबा गणेश मंडळ व शहरातील इतर गणेश मंडळाच्या गणपतींचे विसर्जन खामगाव येथील गोदावरी नदीपात्रात सायंकाळी पाच वाजता करण्यात आले. शहरातील शिवाजी नगरातील एकदंत तारा गणेश मंडळाच्या महिलांनी टाळमृदंगाच्या गजरात मिरवणूक काढली.

कसबा गणपतीला २ हजार मोदकांचा दाखवला नैवेद्य येथील कसबा पेठेतील कसबा गणपती मिरवणुकीदरम्यान फुलांसह रोषणाईने सजवलेल्या रथाला दीड हजार नारळाचे तोरण बांधले होते. कसबा गणपतीला २ हजार मोदक अर्पण केले. पांढऱ्या रंगाच्या साड्या परिधान करून आणि फेटे बांधून १०१ महिलांनी गणपतीची सामुदायिक आरती केली. गणपती बाप्पांना निरोप देताना मंडळातील सदस्यांचे डोळे पाणावले होते.

अंबाजोगाईत टेंभे लेझीम पथकाने आणली रंगत रोषणाई, टेंभे, लेझीम, केदारनाथ दर्शन, भारतमातेसह अन्य विविध देखाव्यांतून अंबाजोगाईत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. टेंभे लेझीम प्रकार आणि वाद्यावर विणला जाणारा गोप, वाद्य पथक हा लेझीम प्रकार हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाने मिरवणुकीत सादर केला.येथील गणेश मूर्तीसमोर आकर्षक देखावे सादर केले. मिरवणुकीदरम्यान फटाक्यांची आतषबाजी, नृत्य, झांज, लेझीम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतचा रस्ता गर्दीने फुलून गेला होता. तालुक्यातील बर्दापूर ठाण्याच्या हद्दीत गणेश मंडळांनी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत सुंदर देखावे सादर केले. गणेश विसर्जन शांततेत पार पडले.

केजमध्ये १९ मंडळांच्या गणपतींचे विसर्जन शहरात लोंढे गल्लीतील संगम गणेश, गुंड गल्लीतील महाराजा गणेश, हनुमान गल्ली गणेश, माळी गल्लीतील त्रिमूर्ती गणेश, गांधी चौकातील व्यापारी गणेश या ५ मानाच्या गणपतींसह अजिंक्यतारा गणेश, सोनार गल्लीत सिद्धिविनायक गणेश, गॅरेज लाईनमध्ये शिवगर्जना गणेश, माळी गल्लीत श्रीराम गणेश, विश्वशक्ती गणेश ,प्रशांत नगरमध्ये वक्रतुंड गणेश, समर्थ नगरमध्ये शिवसमर्थ गणेश , अष्टविनायक गणेश ,नाईकवाडे गल्लीत त्रिमूर्ती गणेश, वकीलवाडीत नवरंग गणेश, क्रांती नगरमध्ये शिवबा गणेश, अहिल्यादेवी नगरमध्ये शिवमल्हार गणेश, विठ्ठल रुक्माई गणेश अशा १९ मंडळांनी केशव जिनिंगजवळील तलावात विसर्जन केले.

बातम्या आणखी आहेत...