आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​चोरच शिरजोर:बस डेपोतच वाळूची जप्त वाहने; दीड वर्षात 7 वाहने माफियांनी पळवली!

गेवराई / विनोद नरसाळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोदावरी नदीच्या पात्रात माफियांकडून तस्करी करताना पकडण्यात आलेली वाळू वाहतूक करणारी वाहने उभी करण्यासाठी गेवराई तहसील कार्यालय व पोलिस ठाण्यात सध्या जागाच नाही. त्यामुळे अशी वाहने शहरातील बस डेपोत दोन सुरक्षा रक्षकाच्या भरवशावर लावली जात आहेत. तहसीलदारांनी पत्र देऊनही ठाण्याकडून पोलिस बंदोबस्त मिळत नाही. मागील दीड वर्षात गेवराईत सात वाहने वाळूमाफियांनी पळवली आहेत.

गेवराईच्या महसूल विभागाच्या पथकाने वाळू चोरी करताना जप्त केलेले ट्रॅक्टर बस डेपोत लावले होते. तीन दिवसांपूर्वी पाच ते सहा जणांनी बसस्थानकाच्या संरक्षक कठड्यावरून आत उडी घेत दोन सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून यातील ५ ट्रॅक्टर पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, हा सगळा प्रकार बसस्थानकाच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

४ मे २०२१ : तहसीलमधून भरदिवसा ट्रक पळवला अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक (एमएच ११ एसी ५५९३) महसूल पथकाने पकडून तहसीलला आणून लावत ट्रक मालकाला १ लाख ८६ हजार ५२८ रुपये दंडाची नोटीस बजावली होती. ४ मे २०२१ रोजी दुपारी नशेतील ट्रकचालकाने तहसीलमध्ये धुडगूस घालून तलाठी अमलेकर आणि तहसीलचे वाहनचालक शेखला मारहाण करत चावी हिसकावून, तहसीलचे गेट तोडून ट्रकसह पळ काढला होता.

२४ नोव्हेंबर २०२२ : गेवराई बस डेपोत जीपमधून आले व जप्त केलेले ५ ट्रॅक्टर पळवले सावरगाव येथे बोटीने वाळू उपसा करणारे दहा ट्रॅक्टर तहसीलदारांनी जप्त करून गेवराई बस डेपोत लावले होते. बुधवारी रात्री एक वाजता एका जीपमधून आलेल्या सात जणांनी बस डेपोच्या कंपाउंडवर चढून आत उड्या टाकून यातील पाच ट्रॅक्टर पळवले.

पत्र देऊनही सुरक्षेसाठी पोलिस मिळेनात गेवराई येथील पोलिस ठाण्याकडून सुरक्षेसाठी पोलिस दिले जात नाहीत. येथील तहसील कार्यालयात जागा कमी असल्याने अवैध वाळूची पकडलेली वाहने सध्या बस डेपोत लावली जात असून अशा वाहनांच्या सुरक्षेसाठी पोलिस ठाण्यात पत्र दिले जाते. परंतु पोलिसांची संख्या कमी असल्याने सुरक्षेसाठी पोलिस दिले जात नाहीत. - सचिन खाडे, तहसीलदार, गेवराई

बातम्या आणखी आहेत...