आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना कहर...:अंबाजोगाईत एकाच सरणावर आठ मृतदेहांना अग्निडाग, 24 तासांत आठ जणांचा मृत्यू

अंबाजोगाई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड जिल्ह्यात अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दररोज शंभरच्या पुढे सरकत आहे. २४ तासांत स्वाराती रुग्णालयातील सात पुरुष व तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील एक महिला अशा आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नगरपालिकेने शहराजवळील मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर आठही जणांना अग्निडाग दिला.

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय व लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये जिल्ह्यातील परळी, केज, धारूर, गंगाखेड, माजलगाव येथील कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी येतात. या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण हे उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाच्या विकाराचे आणि ६० ते ८० वयोगटातील असतात. असे रुग्ण अंगावर आजार काढून जास्त झाल्यानंतरच रुग्णालय गाठतात दोन्ही ठिकाणची मृत्युसंख्या वाढू लागली आहे. अंबाजोगाई तालुक्यात मागील चार दिवसांत ५०० जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी अंबाजोगाई कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. सोमवारी मंगळवार पेठ, भटगल्ली, बोरखेड (परळी), लोखणी दावारागाव, अंबलटेक, आपेगाव, मंगरूळ (माजलगाव) व धारूर अशा आठ गावांतील सात पुरुष व एका महिलेचा उपचार घेताना सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्या आठ कोरोनाबाधितांचे मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर मृतदेहावर मंगळवारी दुपारी पठाण मांडवा रस्त्यावरील नगरपालिकने निर्माण केलेल्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर आठ जणांना अग्निडाग देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...