आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकौटुंबिक वादातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्येचा बनाव करण्यात आल्याचा प्रकार शहरातील पेठ बीड भागात घडला. याप्रकरणी पतीला पोलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. मुस्कान शाहेद शेख असे असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. शहरातील तेलगाव नाका येथील रहिवासी असलेल्या मुस्कन शेख यांचा विवाह १५ महिन्यांपूर्वी माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील शाहेद शेख याच्याशी झाला होता. लग्नाला काही महिने होत नाहीत तोच मुस्कान आणि त्यांच्या सासरकडील मंडळी यांच्यात वाद होऊ लागले. सतत हे वाद होत होते. मुस्कान यंाच्या वडिलांनी अनेकदा हे वाद मिटवले होते मात्र मुस्कान यांना सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात होता. काही दिवसांपूर्वीच सतत वाद होत असल्याने मुस्कान यांचे वडिल जमील शेख यांनी मुस्कानला पात्रूड येथून बीडमध्ये आणले होते. त्यानंतर शाहेदही बीडमध्ये आला होता. त्यांना पेठ बीड भागातील युनूस पार्कमध्ये त्यांनी किरायाने घर करुन दिले होते. तिथे हे दोघे वास्तव्यास होते. ५ एप्रिल रोजी मुस्कान आणि शाहेद यांच्यात पात्रुड येथील घरातील काही सामान बीडमध्ये आणण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. या वादातूनच शाहेद याने ओढणीने गळा आवळून मुस्कान यांचा खून केला.
सोमवारपर्यंत कोठड पेठ बीड पोलिसांनी आरोपी पती शाहीदला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी तथा पेठ बीड ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रामचंंद्र पवार यांनी दिली.
मुस्कान शेख. मुस्कानने आत्महत्या केली दरम्यान, पत्नी मुस्कानचा खून करुन शाहेदने गुरुवारी (दि.६) सकाळी साडेआठ वाजता सासऱ्यांना फोन केला. तुमच्या मुलीची तब्येत ठिक नसून तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्याने सांगितले. नंतर मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव शाहीदने केला.
रुग्णालयात माहेरच्यांचा आक्रोश, वातावरण सुन्न मृत मुस्कान हीला पतीने सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले होते तिथेही त्याने तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. तपासणीनंतर पोलिसांनी ती मृत असल्याचे सांगितले. त्यानंतर मुस्कानच्या माहेरची मंडळी आली. मुलीच्या मृत्यूची माहिती कळताच त्यांनी रुग्णालात आक्रोश केला यामुळे वातावरण सुन्न झाले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयातच शवविच्छेदन केले गेले. शवविच्छेदन अहवालातही खून केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनीही खूनाचा गुन्हा नोंदवून घेत शाहीदला अटक केली. सोमवारी कोठडी संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयाच्या समोर हजर करण्यात येईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.