आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानदी, समाज आणि शासन यांच्यात सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी आजपासून नदी परिक्रमेला प्रारंभ होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य सरकारने //"चला जाणूया नदीला'' या अभियानाची सुरुवात केली आहे. बीड जिल्ह्यातून उगम पावणाऱ्या मांजरा नदीची पूर्ण परिक्रमा करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. या नदीचा चार राज्यांमधून प्रवाह असून त्याची लांबी ७५० किलाेमीटर आहे.
या परिक्रमेस बीड जिल्ह्यात पाटाेदा तालुक्यातील गवळवाडी येथून आज बुधवारपासून ( ४ जानेवारी) सुरुवात केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २७ अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. मांजराकाठच्या ४ तालुके आणि ५२ गावांत ही नदी परिक्रमा काढली जाणार आहे. बीड जिल्ह्याच्या ९० किलाेमीटर अंतर लांबीच्या परिक्रमेसाठी नावीन्यपूर्ण योजनांसाठी मंजूर तरतुदीच्या १० टक्के मर्यादेपर्यंत विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करण्यात आली आहे.
मांजरा नदीचा उगम पाटाेदा तालुक्यातील गवळवाडी येथे झाला असून पुढे ही नदी बीड जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा करत महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात जाते. प्रत्येक ठिकाणी या नदीची वेगवेगळी नावे आहेत. एकूण ७५० किलाेमीटर अंतर असणाऱ्या नदीची परिक्रमा संबंधित जिल्हा प्रशासनाद्वारे केली जाणार आहे.
या संपूर्ण मांजरा नदी परिक्रमेमधून जिल्हा प्रशासनाद्वारे राज्य शासनास अहवाल दिला जाणार आहे. जिल्ह्यातील उद्योगांची गावनिहाय आणि उद्योगनिहाय, नद्यांच्या प्रदूषणाची मागील तीन वर्षांतील अहवाल, मल-जलनिस्सारणाची माहिती, पाण्याचा ताळेबंद (केला असल्यास) अन्यथा त्याची पूरक माहिती, कांदकळणे इ.बाबत माहिती, खाऱ्या आणि गोड्या पाण्याच्या समस्या असलेली गावे, याशिवाय स्थानिक स्तरावर इतर आवश्यक माहितीचा समावेश असणार आहे. बुधवारी सकाळी ८.३० वाजता परिक्रमेस हाेणार प्रारंभ परिक्रमा उद्घाटन सकाळी ८.३० वाजता वन विभागातील अधिकारी व मानवलाेक संस्था पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हाेणार आहे. या वेळी काेणतेही राजकीय भाषण तसेच आदर्श आचारसंहिता भंंग हाेणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शर्मा यांनी दिले.
नावीन्यपूर्ण योजनांसाठी मंजूर तरतुदीच्या १० टक्के मर्यादेपर्यंत विशेष बाब म्हणून निधीची तरतूद चला जाणूया नदीला परिक्रमाचे ११ मुख्य उद्देश नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे, जनसामान्यांना नदीसाक्षर करण्याबाबत उपाययोजना आखणे, नागरिकांच्या सहकायाने नद्यांचा अभ्यास करणे व त्याबाबतचा प्रचार व प्रसार करणे, अमृतवाहिनी बनवण्यासाठी मसुदा तयार करणे.
नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार रूपरेषा आखणे, प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार-प्रसार याबाबत नियोजन करणे, नदी खोऱ्याचे नकाशे, नदीची पूररेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, पर्जन्यमान नोंदी, मागील पाच वर्षांतील पूर आणि दुष्काळाच्या नोंदी याबाबतची माहिती संकलत करणे, पावसाचे पाणी योग्य जागी अडवून भूजल स्तर उंचावणे, जनजागृती करणे. अतिक्रमण, शोषण आणि प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यासणे, नदी संवाद यात्रा आयोजित करण्याबाबत आराखडा तयार करून अंमलबजावणी करणे आदी.
बीड जिल्ह्यातील मांजरा नदीची सीमा पाटाेदा तालुक्यात उगमस्थान गवळवाडी, शेवट पाचंग्री बीड तालुक्यात प्रारंभ गाव पाचंग्री, शेवट पालसिंगन केज तालुक्यात प्रारंभ गाव पालसिंगन, शेवट इस्थळ अंबाजाेगाई तालुक्यात प्रारंभ गाव आपेगाव, शेवट तडाेळा असे एकूण चार तालुक्यातील ५२ गावंमधून ९० किलाेमीटर अंतराची मांजरा नदी परिक्रमा केली जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.