आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात रोटरी क्लबच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या खुल्या नृत्य स्पर्धेत गर्गी गवळी हिने प्रथम, ईशा गायकवाड हिने द्वितीय, श्रावणी जाधव हिने तृतीय क्रमांक पटकावला, तर अर्पित चिद्रवार व अभिषेक जाधवर यांना प्रोत्साहनपर बक्षिसे मिळवलीत.
तत्पूर्वी, शाहीर तुकाराम ठोंबरे यांच्या पथकाने सामाजिक जागृतीवर कार्यक्रम सादर केला. दुसऱ्या सत्रात घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत २१ कलाकारांनी सहभाग नोंदवून सुंदर नृत्य सादर केले. परिरक्षक म्हणून रोटरीचे सदस्य प्रा. डॉ. बी. जे. हिरवे, प्रा. डॉ. सी. एन. सोळुंके, दादा जमाले यांनी काम पाहिले. रोटरीचे अध्यक्ष बापूराव सिंगण, सचिव अरुण अंजान, संस्थापक अध्यक्ष हनुमंत भोसले, प्रोजेक्ट चेअरमन सूर्यकांत चवरे, श्रीराम देशमुख, अरुण नगरे, श्रीराम शेटे यांनी कलाकारांचे व इतर मान्यवरांचे स्वागत केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी पशुपतिनाथ दांगट, विकास मिरगणे, प्रवीण देशपांडे, डॉ. संतोष जोशी, महेश जाजू, विजय जॅकेटीया, सीता बनसोड, डी. एस. साखरे, दादा जमाले, दत्ता हंडीबाग, धनराज पुरी, प्रकाश कामाजी, अनंत तरकसबंद, हारून इनामदार, डॉ. दिनकर राऊत, राहुल सोनवणे, समुचित शेटे, सत्यवान राऊत, संतोष पिलाजी, हनुमंत बोर्डे, भीमराव लोखंडे, बापूराव वाळके, संजय डांगे यांनी विशेष सहकार्य केले.c
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.