आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक:बीड येथे भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव बीड येथे परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र यांच्यावतीने बीड येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन जोशी हे होते. मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुरामांची विधीपूर्वक पूजा करण्यात आली. प्रज्ञाताई रामदासी, नगरसेवक विनोदजी मुळुक, नगर सेवक प्रभाकरराव पोपळे, माजी नगरसेवक, किशोरजी काळे, नगरसेवक राजेंद्र काळे, एकनाथ महाराज पुजारी, कैलास महाराज रामदासी, राजेंद्र थिगळे, प्रशांत सुलाखे या मान्यवरांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस पुष्माला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भरतराव कुलकर्णी, परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष गजानन अशोकराव जोशी, बाळासाहेब थिगळे, संजयराव कुलकर्णी आदी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...