आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामाला गती:चार दिवसात पावसाने कहीशी हजेरी; धारूर तालुक्यात मशागतीच्या कामाला गती

धारूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर तालुक्यात मागील चार दिवसात पावसाने कहीशी हजेरी लावल्याने खरीप हंगामापुर्वी शेतीतील पेरणीपुर्व मशागतीच्या कामाना शेतकरी वर्गाने वेग दिला आहे. वेळेवर पेरणी करण्याच्या प्रतिक्षेत शेतरी आहेत .

मृग नक्षत्र सुरु होवून चार दिवस उलटले आहेत. मृगाच्या सुरुवातीला मान्सुन पुर्व पावसाने हजेरी लावली आहे. दमदार पाऊस न झाल्याने पेरणीही लांबणार असल्याचे चित्र दिसत आहे.त्यापुर्वी शेतीत मोगडा,पाळी(वखरणी ,धसकटे,काडी कचरा वेचणे,जाळणे ही कामे सुरु केली आहेत.

तालुक्यातील काही भागात काल ब-यापैकी पाऊस झाला आहे.तर घाटमाथ्यावर पावसाची आवश्यकता आहे.कारण ज्यांची नांगरट झाली आहे.त्यांच्या वखरणीत मातीची ढेकळे आहेत. हंगाम तोंडावर आल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात आंतर मशागतीच्या कामांना सुरुवात झाली आहे.याच बरोबर खरीपाची पेरणीसाठी बि,बीयाण्यासोबत तणनाशके,औषधे व शेतीत लागणाऱ्या साहीत्याची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकरी वर्गाची लगबग सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...