आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:गेवराईत दुचाकी अडवून चाकूचा धाकावर लुटले ; 10 हजारांच्या रोकडसह 9 हजारांचे मोबाइल लंपास

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीवरून जाणाऱ्या मासे विक्रेत्याची दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवून १० हजारांची रोकड आणि ९ हजारांचे दोन मोबाइल असा १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गेवराई शहराजवळील जमादारणीच्या पुलावर शुक्रवारी घडली. रखमाजी पाराजी घाटे (रा. रामपुरी, ता. गेवराई) असे लूट झालेल्या मासे विक्रेत्याचे नाव आहे.

ते शुक्रवारी दुपारी दीड वाजेदरम्यान गेवराई शहराजवळील प्रेम नगर भागातील जमादारणीच्या पुलाजवळून जात असताना चार अज्ञातांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील १० हजार रुपयांची रोकड व ९ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल असा एकूण १९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी गेवराई पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला.

बातम्या आणखी आहेत...