आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोऱ्यांचे सत्र:घरफोडीत पावणेचार लाखांचा ऐवज लंपास; पाडळशिंगीजवळ वाटमारी

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सराफा लाइन भागात चोरट्यांनी घरफोडी करून ३ लाख ८८ हजार रुपयांचे साेन्याचे दागिने लंपास केले, तर शुक्रवारी सकाळी महिला बचत गटाची ९५ हजारांची रक्कम बँकेत भरण्यासाठी घेऊन जाणाऱ्या पाचेगाव (ता. गेवराई) येथील एकाला पाडळशिंगीजवळ लुटण्यात आले, तर मुगगाव (ता. पाटाेदा) येथे पवनचक्कीचे ८० हजारांचे साहित्य चोरट्यांनी लांबवले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हे नोंद केलेत.

रोड रॉबरीची घटना गेवराई तालुक्यात घडली. बीड येथील आयडीएफसी बँकेतील कर्मचारी सुदर्शन शिवाजी वाघ (रा. माटेगाव, ता. बीड) हे नेहमीप्रमाणे गेवराई तालुक्यातील पाचेगावातून शुक्रवारी महिला बचत गटांची ९५ हजार ६१० रुपयांची रक्कम वसूल करून ती शाखेत भरण्यासाठी बीड येथे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास येत होेते. गेवराई-बीड महामार्गावरील पाडळसिंगीजवळ ते आले असता पाठीमागून एक दुचाकी आली. त्यावर दोघे जण होते. त्यांची दुचाकी जवळ आणून पैशांची पिशवी हिसकावून बीडच्या दिशेने धूम ठोकली. या वेळी कर्मचाऱ्याने आरडाओरडा केली. परंतु, चोर तोपर्यंत पसार झाले. पिशवीत ९५ हजार ६१० इतकी रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. अधिक तपास पोलिस करताहेत.

बीडमध्ये घरफोडीत दागिने लंपास
बीड शहरातील बोबडेश्वर गल्लीत सराफा लाइन भागात मंगल कृष्णकुमार काळेगावकर यांच्या घरात गुरुवारी पहाटे चोरट्यांनी वाड्याच्या भिंतीवरून उडी टाकून प्रवेश केला. त्यांचे पती झोपलेल्या खोलीत जाऊन चोरट्यांनी कपाटाच्या चाव्या मिळवल्या. कपाटातील १० हजार २४८ रुपयांचे मणिमंगळसूत्र, १ लाख ९६ हजार ५०० रुपयांच्या ६ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, ८९ हजार रुपयांचे ३ तोळ्यांचे सोन्याचे गंठण आणि ९२ हजार ६२६ रुपयांचा तीन तोळे अडीच ग्रॅमचा सोन्याचा पोहे हार असा एकूण ३ लाख ८८ हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा नोंद केला.

८० हजारांचे साहित्य चोरी, गुन्हा दाखल
मुगगाव (ता. पाटाेदा) येथे चोरट्यांनी बायोटेक व्हिजन केअर प्रा. लि. कंपनीच्या पवनचक्कीचे ८० हजारांचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी प्रकल्प व्यवस्थापक सी. रत्नाकर यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...