आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिंद्रुड येथे गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गुरुवारी खोलेश्वर देवस्थान येथे उत्साहात करण्यात आली. याप्रसंगी येथील भावी डॉक्टर्ससह गुणवंत विद्यार्थ्यांचा मातापित्यांसह गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. दिंद्रुड (ता.माजलगाव) येथे गेल्या ३३ वर्षांपासून मित्ती माघ पंचमीला श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज जन्मोत्सव व विठ्ठल रुक्मिणी मंदिर वर्धापन दिनानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा ज्ञानयज्ञ व कीर्तन महोत्सव तथा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ग्रामस्थ करतात.
यात राज्यभरातील कीर्तनकार कीर्तन महोत्सवात उपस्थित राहून श्रीचरणी सेवा बजावतात. यंदा २६ जानेवारी रोजी सप्ताहाला प्रारंभ झाला आणि २ फेब्रुवारी रोजी उमेश महाराज दशरथे आळंदीकर यांच्या काल्याचे किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. किर्तनानंतर येथील नीट परीक्षेत यश संपादन करीत वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएससाठी पदार्पण करणाऱ्या गणेश सुंदर कटारे, मंगेश शिवाजी हंगरगे, अक्षय रमेश काटकर, सिद्धेश्वर दत्ता भुजबळ, स्वराज सुधाकर देशमाने, मंजुश्री शिवाजी हंगरगे, बीएएमएस सानिका विलास पारेकर, सिद्धी सतीश जाधव यांच्यासह गुणवंतांचा सत्कार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.