आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखाजगी करणाच्या विरोधात जिल्ह्यातील १५०० वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपात उडी घेतेल्याने या संपाचा जिल्ह्यातील ग्रामीण भागावर परिणाम दिसुन आला. केज, माजलगाव, गेवराई शहरात पहाट पासूनच वीज गायब झाली होती. शिरूर तालुक्यात वीज पुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भागात कांदा लागवड थांबली. वडवणीत आठवडी बाजारावर परिणाम झाला. धारूर तालुक्यातील खडकी देवळा केंद्रातील वीज गायब असल्याने दहा गावातील विद्युत पुरवठा बंद होता. अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालयातील ४५० अधिकारी-कर्मचारी संपात सहभागी झाले होते.
मध्यरात्री बारा वाजेपासून बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत सुरू होता. फ्युज कॉल साठीचे फोन चालू होते. गिरवली येथील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. केज: बुधवारी शहरातील कार्यालयासमोर वीज अधिकारी -कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून निदर्शने केली. संपाच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागातील वीज पुरवठा पहाटे साडेचार वाजल्या पासुन बंद झाल्याने शेतकरी, ग्राहक आणि नागरिक हैराण झाले.धारूरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठ्याची कामे दिवसभर सांभाळली तर केज शहरातील कार्यालयासमोर वीज अधिकारी -कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून निदर्शने केली.
बीड : विजेचा लंपडाव बीड शहरातील काही भागात वीज पुरवठा सुरू होता तर काही भागात सकाळ पासून वीज पुरवठा खंडीत झालेला होता. शहरातील वीज कंपनीच्या जालनारोडवरील मंडल कार्यालयात सनियंत्रण कक्ष स्थापण करून ग्राहकांसाठी मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. दिवसभरात वीज पुरठवा खंडीत होताच ग्राहकांनी भेट संपर्क साधला. वडवणी : आठवडी बाजारावर परिणाम वडवणीत मंगळवारी मध्यरात्रीपासून बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत वीज होती. पंरतु त्यानंतर वडवणी तील वीज पुरवठा खंडीत झाल्याने लघु व मध्यम उद्योग बंद राहिले. बुधवारी येथील बाजार होता. आठवडी बाजारात ग्रामस्थ वीजेची उपकरणे दुरूस्तीसाठी घेऊन येतात वीज नसल्याने ही उपकरणे दुरूस्त करता आली नाही. वीज नसल्याने फॅब्रीकेशन, हॉटेल, छोटे दवाखाने, मेडीकल, शासकीय कार्यालय, बँका, पतसंस्था, शाळा महाविद्यालयातील वीज पुरवठा बंद होता.
गेवराईत : सकाळी सहा वाजताच वीज गायब गेवराई : लाईनमन, आँपरेटर ,आऊट सोर्सस असे ८६ अधिकारी - कर्मचारी आजच्या संपात सहभागी झाले. कर्मचाऱ्यांनी सकाळी महावितरणच्या कार्यालयात जावुन निषेध नोंदवला.मादळमोही महावितरण कार्यालयात सकाळी वीज गेली होती. गेवराईत सकाळी सहा वाजता गेलेली वीज दुपारी १२ वाजता पुर्ववत झाली होती. शिरूर : तालुक्यात कांदा लागवड रखडली शिरूर तालुक्यात ५० वीज अधिकारी कर्मचारी संपात सहभागी झाले होते.दगडवाडीतील १३२ केव्ही सबस्टेशन वरुन ब्रम्हनाथ येळंब,फुलसांगवी, पिंपळनेर,लोणी,पारगाव , पौंडूळ,खालापुरी,रायम ोहा या गावांना होणारा वीज पुरवठा खंडित झाला होता. शिवाय शिरूर शहरातील महावितरणचे मुख्य कार्यालय बंद होते.वीज पुरवठा खंडीत असल्याने बीएसएनएलची रेंज देखील गायब होती.
धारूर : तालुक्यात दहा गावात वीज गुल धारूर- येथील सहाय्यक उपअभियंता कार्यालय व शाखा अभियंता कार्यालयाला बुधवारी कुलूप होते .कंत्राटी कर्मचाऱ्यांनीच विद्युत पुरवठ्याची कामे दिवसभर सांभाळली. धारूर, चिंचवण, आडस, अासरडोह, आंबेवडगाव, भोगलवाडीफाटा, खडकी देवळा, होळ या सात केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत परंतु खडकी देवळा केंद्रातील वीज गायब असल्याने दहा गावातील विद्युत पुरवठा बंद होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.