आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे पिके बहरली आहेत. मात्र हरणांच्या कळपांनी उच्छाद मांडल्याने शेतकऱ्यांना अगदी वीट आला आहे. शिरूर तालुक्याला हरणांच्या तडाख्याचा मोठा फटका बसत आहे. दरवर्षी हरणांकडून होणाऱ्या नुकसानीपोटी शेतकरी वन विभागाकडे भरपाईची मागणी करतात. ती मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
आययूसीएनच्या मते काळवीट दुर्मिळ
आययूसीएनने (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) काळविटाला दुर्मिळ आणि नामशेष होणारा प्राणी म्हणून घोषित केले आहे. नर काळवीट काळसर तर मादी ही भुऱ्या रंगाची असते. नरांना शिंगे असतात तर माद्यांना ती नसतात.
दीडशेचा कळप, पिकांवर ताव
शिरूर तालुक्यातील तागडगाव, खालापुरी, पाडळी, जांब, दगडवाडी हा माळरानाचा परिसर असून या ठिकाणी रोज २००० हरणे-काळवीट येतात. साधारणत: एका कळपातील प्राणिसंख्या १० ते १५० पर्यंत असते. - सिद्धार्थ सोनवणे, प्रकल्प संचालक, सर्पराज्ञी प्रकल्प
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.