आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृत भाषा:खऱ्या अर्थाने संस्कृत भाषा ही ज्ञानभाषा आहे : डॉ. कुलकर्णी

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये संस्कृतचा अधिक प्रभाव होता आणि त्यामुळे संस्कृत ही ज्ञानभाषा आहे, असे प्रतिपादन संस्कृत भारतीचे प्रांत अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी केले. बीड येथील स्वा.सावरकर महाविद्यालयातील संस्कृत विभागाच्या वतीने आयोजित संस्कृत दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह डॉ.विवेक पालवनकर हे होते तर प्राचार्य देविदास नागरगोजे, उपप्राचार्य डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर व डॉ.राजेश ढेरे तसेच संस्कृत विभाग प्रमुख डॉ. सचिन कंदले हे उपस्थित होते. ‘संपूर्ण कार्यक्रम संस्कृत भाषेत’ हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य राहिले. या कार्यक्रमात संस्कृत गीत गायन, संस्कृत मनोगत, भित्तीपत्रकाचे विमोचन त्याचबरोबर इयत्ता बारावीत संस्कृत विषयात ९० पेक्षा अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य देविदास नागरगोजे यांनी संस्कृत दिन किंवा श्रावण पौर्णिमा हा पूर्वीच्या काळातील वेदाध्ययन प्रारंभाचा काळ होता, याच दिवशी वेदाभ्यास सुरू होत असे सांगितले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. विवेक पालवनकर यांनी केला. याप्रसंगी विद्यापीठ वर्धापनदिनी आयोजित पोस्टर स्पर्धेतील विजेते राधिका वझे, अजय शिंदे व साक्षी भालेकर यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ.सचिन कंदले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...