आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:बहुमत नसताना पतसंस्था‎ बचाव पॅनलने मारली बाजी‎

केज‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज येथील शिक्षकांची सहकारी‎ पतसंस्थेच्या अटीतटीच्या निवडणुकीत‎ पतसंस्था विकास पॅनलने आठ‎ जागेवर, तर पतसंस्था बचाव पॅनलने‎ सात जागा मिळाल्या होत्या. मात्र स्पष्ट‎ बहुमत नसताना पतसंस्था बचाव‎ पॅनलने भाजप नेते रमेश‎ आडसकरांच्या मार्गदर्शनाखाली बाजी‎ मारली. पतसंस्थेच्या चेअरमनपदी‎ कल्याण काळे यांची तर सचिवपदी‎ संजय गलांडे यांची निवड केली.‎ चेअरमन, सचिव पदाच्या‎ निवडीच्या वेळी बहुमत नसलेल्या‎ पतसंस्था बचाव पॅनलने भाजप नेते‎ रमेश आडसकर यांच्या‎ मार्गदर्शनाखाली पतसंस्था विकास‎ पॅनलच्या दोन संचालकांना आपल्या‎ गोटात सामील करीत पतसंस्थेवर‎ वर्चस्व मिळविले. पतसंस्थेच्या‎ चेअरमन पदाच्या निवडणुकीत‎ कल्याण काळे यांनी नऊ मते घेत‎ विजय मिळविला.

तर त्यांच्या‎ प्रतिस्पर्धी उमेदवार स्वाती शेप यांना‎ सहा मते पडली. तर व्हॉइस‎ चेअरमनपदी बाळासाहेब अंकुशे यांची‎ बिनविरोध निवड झाली. सचिवपदी‎ संजय गलांडे यांची खजिनदारपदी‎ किशोर भालेराव यांची निवड झाली.‎ निवडणूक निर्णय अधिकारी‎ राधाकिसन मोटे यांनी काम पाहिले.‎ सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा‎ आडसकर यांच्या निवासस्थानी‎ सत्कार करण्यात आला. दत्ता धस,‎ अरुण धपाटे, राम जोगदंड, लक्ष्मण‎ घुले, श्रीकांत उजगरे यांच्यासह‎ शिक्षक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...