आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भामटे पसार:केजमध्ये बँकेतून वृद्धाचे पैसे लुटून दोन भामटे पसार

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बँकेतून पैसे काढून बँकेच्या बाहेर आल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी रस्त्यावर उभ्या राहिलेल्या वृद्धांचे ५० हजार रुपये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी घेऊन पोबारा केल्याची घटना केज शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर घडली.

साळेगाव (ता. केज) येथील त्रिंबक गित्ते हे सोमवारी दुपारी २.३० ते ३ वाजेच्या सुमारास शहरातील कळंब रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून खात्यावरील ५० हजार रुपये काढून ते पैसे बँकेतून रोखपालाकडून घेतल्यानंतर खाते पुस्तिकेत त्याची नोंद घेतली. नंतर पैसे व पासबुक त्यांनी बनियनच्या खिशात ठेऊन गावाकडे जाण्यासाठी बँके समोर उभे असताना कळंबकडून दुचाकीवरून दोघे आले. त्यापैकी एक जण खाली उतरून त्यांच्या जवळ आला. त्याने त्रिंबक गित्ते यांच्याशी जवळीक साधून बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील ५० हजार रुपये घेतले व पळून गेला.

बातम्या आणखी आहेत...