आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल:नियमबाह्य वाळू घाटसंदर्भात ; गंगावाडीतील वाळू घाट अहवाल येईपर्यंत बंद ठेवा

गेवराई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाधिकारी कार्यालयात गंगावाडी येथील नियमबाह्य वाळू घाटसंदर्भात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत गंगावाडी येथील वाळू घाट बंद ठेवण्याचे आदेश गेवराईचे तहसीलदार व वाळू घाटाच्या ठेकेदार यांना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत.

गंगावाडी येथे नियमबाह्य सुरू असलेला वाळू घाट बंद करावा, या मागणीसाठी ३१ मे २०२२ रोजी गंगावाडी ग्रामस्थांनी ग्रामसभा बोलावली. या ग्रामसभेला आमदार लक्ष्मण पवारांसह तलाठी, मंडळ आधिकारी, ग्रामसेवक, नागरिक उपस्थित होते. या ग्रामसभेत एकमताने नियमबाह्य वाळू घाट बंद करण्याचा ठराव घेतला होता. वाळू घाट बंद न केल्यास २ जूनपासून उपोषणाचा इशारा ग्रामसभेत दिला. प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे २ तारखेला गंगावाडी ग्रामस्थांसह उपोषण सुरू केले होते.

तहसीलदारांच्या विनंतीवरून २ दिवसांची मुदत देऊन सर्वानुमते उपोषण मागे घेतले. २ दिवसांत वाळू घाट बंद न झाल्यास ४ जूनला जल आंदोलन करण्याचा इशारा दिला. प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे ४ जून रोजी गंगावाडी ग्रामस्थांनी ८ तास सुरू जल आंदोलन केले. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी समितीची बैठक घेऊन टेंडर रद्द करू असे आश्वासन दिले व त्यानंतर जल आंदोलन मागे घेतले होते.

हा एकजुटीचा विजय
सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत गावचे प्रतिनिधी म्हणून गंगावाडीतील दोन व्यक्तींचा सहभाग होता. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक व गेवराईचे तहसीलदार यांच्या उपस्थितीतील बैठकीत सर्वानुमते जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत गंगावाडीतील वाळू घाट बंद ठेवण्याचे आदेश गेवराईचे तहसीलदार व वाळूघाटच्या ठेकेदाराला दिले. हा आदेश म्हणजे एकजुटीचा विजय असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...