आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत:मसेवाडी ग्रामपंचायत‎ क्षीरसागर यांच्या ताब्यात‎

बीड‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मसेवाडी‎ ग्रामपंचायतची निवडणूक‎ बिनविरोध झाली असून ही‎ ग्रामपंचायत माजी मंत्री जयदत्त‎ क्षीरसागर यांच्या ताब्यात आली‎ असून, या ठिकाणी विरोधी गटाला‎ एकही उमेदवार मिळाला नाही.‎ ग्रामपंचायत निवडणूकीची‎ रणधुमाळी सुरू असून काही‎ ठिकाणी तिरंगी, चौरंगी तर काही‎ ठिकाणी सरळ सामना होत‎ असताना मसेवाडी ग्रामपंचायतची‎ निवडणूक बिनविरोध झाली असून‎ सरपंचपदी सौ.सिमा प्रकाश मांडवे‎ यांची तर सदस्य म्हणून अनुराधा‎ सुंदर मांडवे, देवईबाई राजाभाऊ‎ कदम, रूक्मीणबाई ज्ञानदेव मांडवे,‎ कैलास मांडवे, बाळू मांडवे,‎ उत्तरेश्‍वर मांडवे यांची सहा‎ जागेसाठी सहाच उमेदवारी अर्ज‎ दाखल झाल्याने बिनविरोध निवड‎ झाली.

ही ग्रामपंचायत माजी मंत्री‎ जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात‎ आली आहे. सरपंच, नवनिर्वाचित‎ सदस्यांचे माजी मंत्री जयदत्त‎ क्षीरसागर यांनी अभिनंदन करून‎ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा‎ दिल्या.‎ या ग्रामपंचायतची निवडणूक‎ बिनविरोध पार पाडण्यासाठी‎ जगन्नाथ मोरे, राजाभाऊ कदम,‎ शामसुंदर मांडवे, रामहरी मांडवे,‎ अशोक मोरे, प्रकाश मांडवे आदींनी‎ परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...