आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने डिसेंबर २०२२ ते मार्च २०२२ या कालावधीत मविमच्या कार्यक्षेत्रातील बचत गटातील महिलांच्या तब्बल दोन हजार मुलींचे सुकन्या योजनेते खाते उघडले जाणार असून मुलींच्या हाती पासबुक येणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त हा उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येणार असल्याची माहिती मविमचे जिल्हा समन्वय अधिकारी एस.बी. चिंचोलीकर यांनी दिली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मविमच्या वतीने जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आले.
त्याच बरोबर महिला आरोग्य तपासी शिबिर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. लोकसंचलित साधन केंद्र व स्वयंसहाय्य महिला बचतगटाच्या सहकार्याने मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी बचतगटातील गरजू महिलांच्या सहा महिने ते दहा वर्षांच्या आतील मुलींसाठी सुकन्या योजने खाते सुरु करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून येत्या मार्च २०२३ पर्यंत किमान दोन हजार मुलींचे सुकन्या योजनेचे खाते काढून देण्यात येणार आहे.
यावेळी लेखाधिकारी मुंजेवार, व्यवस्थापक उषा राठोड, सहयोगिनी, भागवत गायकवाड, संतोष ठाकूर आदी उपस्थित होते. वीस हजार महिलांना हेल्थ कार्ड महिला आर्थिक विकास महामंडळाच्या या उपक्रमांतर्गत महिलांमधील ऍनिमियाचे निर्मूलन करण्यासाठी बीड जिल्ह्यातील २० हजार महिलांचे हिमोग्लोबिन व आरोग्य तपासणी करून त्यांना हेल्थ कार्ड वाटप करण्यात येणार आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.