आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:बीड तालुक्यात सेवा सहकारी सोसायटींच्या निवडणुकांत रंगत; जरुड, कुटेवाडी, नामलगाव सेनेकडे, रौळसगावात शिवसंग्राम

बीड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या पार पडत आहे. शिवसेनेसह शिवसंग्रामकडेही काही सेवा सोसयाटी येत असल्याचे चित्र आहे. कुटेवाडी, जरूड ग्रुप सेवा सहकारी सोसायटी व नामलगाव सेवा सोसायटी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात आली तर रौळसगाव सेवा सोसायटी शिवसंग्रामच्या ताब्यात गेली आहे. कुटेवाडी, जरूड सेवा सहकारी सोसायटीच्य चेअरमनपदी पांडूरंग काकडे तर व्हाईस चेअरमनपदी सुंदर कुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर, संचालक पदी शाम काकडे, रामहरी कुटे, भगवान काकडे, सुमनबाई भगवान काकडे, दामोदर काकडे, विनोद काकडे, नवनाथ शहामाने, नवनाथ कांबळे, प्रकाश काकडे यांची निवड झाली आहे. नामलगाव सेवा सहकारी सोसायटी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या ताब्यात आलेली असून चेअरमनपदी बाबासाहेब शेळके तर व्हाईस चेअरमनपदी शिवाजी घोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक पदी गोवर्धन शेळके, बापूराव पिंगळे, लक्ष्मण बावळे, गणेश शेळके, विठ्ठल नतणे, नंदकुमार शेळके, एकनाथ डोळस, अनिता गणेश पुजारी, सिताबाई रामहरी चव्हाण, बाबासाहेब कुदवण, नरहरी उपरे यांची निवड झाली असून नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक यांचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, जिल्हा प्रमुख अनिल जगताप, उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, दिनकर कदम, गंगाधर घुमरे, विलास बडगे, विजय सरवदे, सरपंच रामदास शेळके, अविनाश पुजारी यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

जरुड येथील निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी सरपंच रामनाथ काकडे, बाळासाहेब कुटे, बाळासाहेब वरेकर, जालिंदर कुटे, बळीराम महाराज कुटे, शाम काकडे, दिपक काकडे, गणेश काकडे, तुकाराम काकडे, रामप्रभू काकडे, शिवाजी काकडे यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...