आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमुरीतुमरी:बीडीओंच्या दालनातच भाजपच्या पदाधिकाऱ्यात हमुरीतुमरी

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीच्या कामावरून आष्टी येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनातच मंगळवारी भाजपच्या दोन माजी पदाधिकाऱ्यांत हामरीतुमरीचा प्रकार घडला. या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी फोन घेतला नाही.१५ व्या वित्त आयोगाच्या कामांबाबत आष्टीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता भाजपचे एक माजी जिल्हा परिषद सदस्य दालनात आले होते.

या वेळी तिथे भाजपचे अन्य एक पंचायत समिती सदस्याचे दीर आले. या दोघांमध्ये गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्यासमोर जोरदार बाचाबाची झाली. ही बाचाबाची पाहून दस्तुरखुद्द गटविकास अधिकारी मुंडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याप्रकरणी गटविकास अधिकारी मुंडे यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने त्यांची बाजू कळू शकली नाही.

बातम्या आणखी आहेत...