आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास- कामे:सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचा; बीड मतदारसंघात विकास- कामे आणण्यासाठी प्रयत्नरत

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत.विकासाचा यज्ञ सुरूच ठेवला आहे.मुख्यमंत्री ठाकरेंच्या माध्यमातून बीड विधानसभा मतदार संघात विकास कामे खेचून आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या शुभ हस्ते मातोश्री पाणंद रस्ता योजने अंतर्गत रस्ता कामाचे उद‌्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी वशिष्ठ ढगे, माऊली शिंदे, रामदास वांढरे, सूर्यकांत जगताप, गणेश काळे, सोमनाथ वांढरे, बाबासाहेब शिंदे, दिगंबर शिंदे, अशोक शिंदे, संतोष हिंदोळे, श्रीधर गायकवाड, चंद्रकांत रहाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख जगताप म्हणाले, मातोश्री पाणंद रस्ते योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक नव्या रस्त्यांना मंजुरी मिळालेली आहे. तसेच तालुक्यातील शेत रस्त्यांचा अनुशेष लवकरच भरून निघणार आहे. त्यामुळे शेती साहित्य थेट बांधावर नेण्यास शेतकऱ्यांना मदत होत आहे, ही आनंदाची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...