आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:खो- खो स्पर्धेत विद्यालयाचे तिन्ही संघ विजेते, विजेत्या खेळाडूंचा केला गेला सत्कार‎

बीड‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा व ‎तालुकास्तरीय खो -खो स्पर्धेत सैनिकी विद्यालयाने निर्विवाद वर्चस्व राखले.तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत १४ ,१७, व‎ १९ वर्षांखालील मुलांच्या संघांनी तिहेरी ‎विजेतेपद पटकावले असल्याची माहिती‎ सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य एस. ए. डाके‎ यांनी दिली.‎ गटशिक्षण अधिकारी कार्यालय, ‎ ‎ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन‎ समिती बीड व सैनिकी विद्यालय बीड‎ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय खो खो व मैदानी क्रीडा‎ स्पर्धा नुकतीच सैनिकी विद्यालयाच्या‎ मैदानावर पार पडली. जवळपास ६ दिवस‎ चाललेल्या या स्पर्धेमध्ये १४, १७ व १९‎ वर्षांखालील शालेय मुलांच्या संघांनी प्रथम‎ क्रमांक पटकावला असून जिल्हास्तरीय‎ शालेय खो खो स्पर्धेसाठी या तिन्ही संघाची‎ निवड झाली आहे.‎ १७ व १९ वर्षांखालील वयोगटातील‎ मुलांच्या मैदानी क्रीडा स्पर्धेतही सैनिकी‎ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखले.‎

१७ वर्षाखालील गटात १५०० मीटर धावणे‎ मध्ये अनुराग मार्कड याने प्रथम तर ८००‎ मीटर धावण्यामध्ये गणेश घोगरे यांनी‎ द्वितीय क्रमांक पटकावला आहे. १०० मीटर बाय ४ रिले स्पर्धेत रामेश्वर गवळी,‎ अनुराग मार्कड, प्रताप तुपे, अरविंद पांढरे‎ व अर्णव डोंगरे यांनी दुसरा क्रमांक‎ पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तालुका‎ संघात स्थान पटकावले आहे.‎ १९ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये‎ शुभम दराडे , विशाल पवार , प्रवीण पांढरे‎ यांनी धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला‎ तर प्रदुन्न जाधव याने ५००० मीटर‎ धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला‎ आहे. प्रदुम्न जाधव याने हातोडा फेक मध्ये‎ प्रथम, शुभम दराडे याने लांब उडी मध्ये‎ द्वितीय तर संदीप खांडे याने तिहेरी उडी‎ मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ४‎ बाय १०० मीटर रिले धावण्यामध्ये शुभम‎ ‎ दराडे, ओंकार हराळे, केशव पवार, अर्जुन‎ बागलाने व संदीप खांडे यांनी प्रथम क्रमांक‎ पटकावला आहे .

या सर्व खेळाडूंना डॉ‎ अविनाश बारगजे, डॉ विनोदचंद्र पवार,‎ मेघराज कोल्हे व विजयकुमार धारणकर‎ यांचे मार्गदर्शन लाभत आहे.‎ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिक्षण‎ संस्थेचे सचिव डॉ. भारतभूषण क्षीरसागर ,‎ संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर,‎ डॉ. योगेश क्षीरसागर, जिल्हा क्रीडा‎ अधिकारी सुहासिनी देशमुख, प्राचार्य एस.‎ ए.डाके यांच्यासह सर्व शिक्षक, प्राध्यापक ,‎ शिक्षकेतर कर्मचारी आदींनी खेळाडूंचे‎ अभिनंदन करून जिल्हास्तरीय शालेय‎ क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...