आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव तालुक्यातील सावरगाव येथे २०१२ मध्ये उभारण्यात आलेल्या पंचतारांकित एमआयडीसी मध्ये सध्या तीन उद्योग सुरू आहेत. नवीन वर्षात या ठिकाणी विजेबरोबरच पाण्याची व्यवस्था होणार असल्याने येथे आणखी उद्योग येणार असल्याने हजारो सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. तालुक्यातील सावरगाव येथे २०१२ मध्ये पंचतारांकित एमआयडीसी सुरू करण्यात आली.
१५९.५२ हेक्टरवर उभारण्यात आलेल्या या एमआयडीसीत १८३ इंडस्ट्रियल प्लॉट तयार करण्यात आले असुन त्यात सहा कमर्शियल वाणिज्य प्लॉट असे एकूण १८९ प्लॉट उद्योगासाठी पाडण्यात आले आहेत. यापैकी ८१ भूखंड वाटप करण्यात आले आहेत. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या सुपुत्र वीरेंद्र सोळंके यांचा वस्त्रोद्योग या ठिकाणी सुरू झाला आहे. याचबरोबर ऑइल मिल, डाळ मिल प्रॉडक्शन असे दहा उद्योग सध्या उभारत आहेत. माजलगाव येथील एमआयडीसी अंतर्गत रस्ते पाणी व वीज सध्या उपलब्ध असून यावर छोटे छोटे उद्योग सध्या सुरु आहेत.
परंतु नवीन वर्षात माजलगाव धरणातून उद्योगासाठी लागणारे मुबलक पाणी हे पाईपलाईनद्वारे या ठिकाणी येणार आहे. तसा प्रस्ताव देखील मंजूर झाला आहे. दुसरीकडे विजेची कमतरता भासू नये म्हणून एमआयडीसीत एमएसईबीची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. येथेच वीज प्रकल्प उभारला जाणार आहे. आता नवीन वर्षात या दोन्ही सुविधा लवकरात लवकर सुरू होणार असल्याने या ठिकाणी नवीन वर्षामध्ये आणखी मोठ मोठे उद्योग येणार असल्याने सुशिक्षित सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे बेरोजगारांत समाधानाचे वातावरण आहे.
माजलगाव येथील एमअायडीसीचे ड्राेनच्या सहाय्याने घेतलेले छायाचित्र छाया : गाेविंद उगले, माजलगाव सरळ पद्धतीने वाटप येत्या दोन महिन्यांमध्ये माजलगाव येथील पंचतारांकीत एमआयडीसी मध्ये ८० टक्के भूखंडाचे सरळ पद्धतीने वाटप होणार आहे. १०८ प्लॉट शिल्लक आहे. या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या येणार अाहे. ़-अरुण व्ही.मोरे, सहायक, एमआयडीसी.सहाच तास वीज ठिकाणी उद्योग येत आहेत परंतु, अद्याप वीजपुरवठा पूर्णवेळ नाही. सध्या केवळ सहा तास वीज दिली जात आहे. त्यामुळे उद्योजकांना अडचणी आहेत. वीज आणि पाणी मिळाल्यास उद्योग वाढतील. -संतोष तापडीया, उद्योजक माजलगाव
महामार्गाचा फायदा माजलगाव शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत. पहिला कल्याण विशाखापट्टणम महामार्ग आहे तर, दुसरा खामगाव - पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. दोन महामार्गामुळे एमआयडीसीतील उद्योगांना दळणवळणाची सुविधा सुकर होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.